How To Make Egg Cheese Paratha Healthy Breakfast Recipe In Marathi
Recipe : प्रथिनांनी भरपूर, सकाळच्या नाश्त्यासाठी एक परफेक्ट पर्याय… घरच्या घरी बनवा टेस्टी ‘अंडा चीज पराठा’
Egg Cheese Paratha Recipe : अंड्यामध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात जे आपल्याला दिवसभर ॲक्टिव्ह ठेवण्यास मदत करतात. याला थोडा ट्विस्ट देऊन तुम्ही यापासून चवदार असा अंडा चीज पराठा तयार करू शकता.
सकाळचा नाश्ता हा पौष्टिक असावा जेणेकरून दिवसभर शरीरात ऊर्जा राहील
अंडा चीज पराठा चवीला अप्रतिम लागतो, ज्यामुळे तो सर्वांनाच आवडतो
भारतीय घरांमध्ये पराठे हा नाश्ताआणि डब्यासाठीचा नेहमीचा, पण अत्यंत आवडता पर्याय असतो. आलू पराठा, पनीर पराठा, गोभी पराठा असे अनेक प्रकार आपण खातो; पण थोडं फ्युजन करून काहीतरी हटके बनवायचं असेल तर एग चीज पराठा हा उत्तम पर्याय आहे. यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम आणि चव यांचा परफेक्ट मेळ साधला जातो. पराठ्याची पारंपरिक चव आणि अंड्याची सॉफ्ट टेक्स्चर याला आकर्षक बनवते, त्यातच चीज घातल्यामुळे एक अप्रतिम क्रीमी टच मिळतो. हा पराठा मुलांच्या डब्यासाठी किंवा झटपट पण पौष्टिक नाश्त्यासाठी अगदी योग्य आहे. सर्वात खास म्हणजे हा पदार्थ बनवायला खूप सोपा आहे आणि जास्त साहित्यही लागत नाही. गरमागरम गॅसवरून उतरलेला अंडा चीज पराठा चटणी किंवा केचपसोबत खाल्ला तर याची चव आणखीन बहारदार बनेल. ही एक डिश आहे जी लहानच काय तर मोठेही आवडीने खाऊ शकतात. लगेच नोट करून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात गव्हाचे पीठ, मीठ आणि थोडेसे पाणी घालून नरम आणि मऊ पीठ मळून घ्या. त्यावर ओलसर कापड ठेवून 10 मिनिटे झाकून ठेवा.
एका वाडग्यात अंडी फोडून चांगले फेटा. त्यात कांदा, मिरची, कोथिंबीर, किसलेले चीज, काळी मिरी आणि मीठ टाकून सर्व मिश्रण छान मिसळून घ्या.
पिठाचे गोळे तयार करून पोळीच्या आकाराची पारी तयार करा.
वरील पारीच्या मध्यभागी 3–4 टेबलस्पून अंडा-चीजचे मिश्रण घाला. कडा एकत्र आणून पोटलीसारखे बंद करा आणि हलक्या हाताने लाटून पराठा तयार करा. (जास्त दाबू नका, अंड्याचे मिश्रण बाहेर येऊ शकते.)
तवा मध्यम आचेवर गरम करा. पराठा तव्यावर ठेवून दोन्ही बाजूंनी थोडेसे तेल/तूप लावून शेकत राहा.
पराठा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत दोन्ही बाजूंनी समान शेकून घ्या. अंड्याचे मिश्रण आत पूर्णपणे सेट झालेले असेल याची खात्री करा.
गरमागरम एग चीज पराठा प्लेटमध्ये काढा आणि टोमॅटो केचप, पुदिना चटणी किंवा दह्यासोबत सर्व्ह करा.