श्रावण महिन्यातील उपवासाला झटपट बनवा उपवासाची झणझणीत मिसळ
सणांचा महिना म्हणून श्रावण महिन्याची खास ओळख आहे. या महिन्यात व्रत, पूजा, उपवास तर अनेक ठिकाणी सत्यनारायण पूजा केली जाते. श्रावणातील प्रत्येक सामोवारी महिलांसह पुरुषसुद्धा उपवास करतात. उपवासाच्या दिवशी फळे किंवा साबुदाण्यांपासून बनवलेले पदार्थ खाल्ले जातात. पण नेहमीच साबुदाणे खाऊन कंटाळा आल्यानंतर घरी झटपट उपवासाची मिसळ बनवू शकता. नेहमीच झणझणीत तिखट आणि कडधान्यांचा वापर करून मिसळ बनवली जाते. पण उपवास केल्यानंतर झणझणीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही घरी मिसळ बनवू शकता. उपवासाची मिसळ बनवताना त्यात लसूण, कांदा किंवा कोणत्याही कडधान्यांचा वापर केला जात नाही. तर ही मिसळ बनवताना शेंगदाणे आणि बटाटा वापरला जातो. उपवास केल्यानंतर कायमच फळे, मिल्कशेक किंवा ज्युस बनवून प्यायले जातात. पण कायमच या पदार्थांचे सेवन करण्याऐवजी उपवासाचे चमचमीत पदार्थ बनवून खावेत. चला तर जाणून घेऊया उपवासाची मिसळ बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य –pinterest)
दुपारच्या जेवणात काय बनवावं सुचत नाही? मग झटपट बनवा काळ्या चण्यांचा भात, नोट करून घ्या रेसिपी