१० मिनिटांमध्ये बनवा कोवळ्या हिरव्यागार हरबऱ्याची झणझणीत आमटी
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतात. त्यातील सगळ्यांच्या आवडीची भाजी म्हणजे ओले हरभरे. ओले हरभरे थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. ओल्या हरभऱ्यांपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. भाजी, कटलेट इत्यादी पदार्थ बनवले जातात. हिरव्या हरभऱ्याच्या हरियालबूट किंवा टहाळ असे सुद्धा म्हणतात. अनेक घरांमध्ये हिरव्या हरभाऱ्यांपासून भाजी किंवा आमटी बनवली जाते. जेवणाच्या ताटात हिरव्या हरभऱ्याची आमटी असेल तर दोन घास जेवण जास्त जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला 10 मिनिटांमध्ये हिरव्या हरभऱ्याची आमटी कशी बनवायची, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया हिरव्या हरभऱ्याची आमटी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा