पुरण तयार करून शिल्लक राहिलेल्या कटापासून बनवा झणझणीत कटाची आमटी
होळी सणाच्या दिवशी सर्वच घरांमध्ये पुरणपोळीचा बेत केला जातो. चवीला गोड असलेली पुरणपोळी लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडते. पुरणपोळी बनवताना चणाडाळीचा वापर केला जातो. चणा डाळ शिजवून त्यातील पाणी बाजूला काढून नंतर डाळीपासून पुरण तयार केले जाते. याशिवाय डाळीच्या पाण्याचा वापर करून कटाची आमटी बनवली जाते. डाळीच्या पाण्याला कट असे बोलले जाते. धान्य किंवा डाळींचे पाणी आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. त्यामुळे रोजच्या आहारात देखील डाळींच्या पाण्याचे सेवन सूप म्हणून करू शकता. भारतीय संस्कृतीमध्ये कोणताही पदार्थ वाया जाऊ देत नाहीत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पारंपरिक पद्धतीने कटाची झणझणीत आमटी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने कटाची आमटी बनवल्यास चव अतिशय सुंदर लागेल. चला तर जाणून घेऊया कटाची आमटी बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
होळी सणानिमित्त घरी बनवा ‘लुसलुशीत मऊ पुरणपोळी’, पारंपरिक पद्धतीने बनवा पदार्थ
गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास अवघ्या २० मिनिटांमध्ये बनवा साजूक तुपातला मैसूरपाक