सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी झटपट बनवा चविष्ट मलई पराठा
लहान मुलांना सकाळच्या नाश्त्यात कायमच चमचमीत आणि चविष्ट पदार्थ खाण्याची इच्छा होते. मुलांना कांदापोहे, उपमा, शिरा किंवा आलू पराठा खाण्याचा कायमच कंटाळा येतो. अशावेळी मुलांना नाश्त्यामध्ये नेमकं काय खाण्यास द्यावं? हा प्रश्न कायमच पालकांना पडतो. सकाळच्या नाश्त्यात हेल्दी आणि टेस्टी पदार्थांचे सेवन करावे. कारण पोटभर नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. याशिवाय लहान मुलांच्या निरोगी आरोग्यासाठी पोषण आहार अतिशय महत्वाचा आहे. रोजच्या आहारात खाल्ले जाणारे पदार्थ मुलांच्या वाढीसाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे त्यामुळे संतुलित आणि पोषण आहार देणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात मलाई पराठा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं मलाई खायला खूप जास्त आवडते. चला तर जाणून घेऊया मलाई पराठा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)