शिल्लक राहिलेल्या भातापासून १० मिनिटांमध्ये झटपट बनवा टेस्टी पनीर पुलाव
रात्रीच्या जेवणात बऱ्याचदा भात जास्त बनवल्यानंतर तो सकाळी नाश्त्यात फोडणीचा भात बनवून खाल्ला जातो. कांदा, लाल तिखट आणि इतर मसाल्यांचा वापर करून बनवलेला भात चवीला अतिशय सुंदर लागतो. पण नेहमी नेहमी शिळा भात खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. यामुळे पोटात ऍसिडिटी वाढून अपचनाची समस्या उद्भवते. दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात शिल्लक राहिलेला भात एकतर फेकून दिला जातो किंवा दुसऱ्या दिवशी प्राण्यांना खाण्यासाठी दिला जातो. पण शिल्लक राहिलेला भात फेकून न देता तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये पनीर पुलाव बनवू शकता. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगल्याचं पनीर खायला खूप आवडत. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये पनीर पुलाव बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
कोकणातील पारंपरिक पद्धतीने सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा रस खापरोळी, पदार्थाची चव चाखून मिळेल सुख