लहान मुलांच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा चविष्ट शेंगदाणा चाट
सकाळी उठल्यानंतर लहान मुलांच्या नाश्त्यासाठी नेहमी नेहमी काय बनवावं? हे अनेकदा सुचत नाही. लहान मुलांना नेहमीच बाहेरचे चमचमीत पदार्थ खायला खूप आवडतात. मात्र मुलांच्या आरोग्यासाठी सतत बाहेरचे पदार्थ खाणे अतिशय हानिकारक आहे. मुलांच्या वाढीसाठी आणि हाडांच्या आरोग्यासाठी घरी बनवलेले पौष्टिक पदार्थ फायदेशीर ठरतात. त्यामुळे लहान मुलांना तुम्ही नाश्त्यात शेंगदाणा चाट बनवून देऊ शकता. लहान मुलं शेंगदाणे आवडीने खातात. अजूनही बऱ्याच घरांमध्ये लहान मुलांना शेंगदाणे आणि गूळ खाण्यास दिले जाते. यामुळे शरीरातील लोहाची कमतरता भरून निघते आणि रक्ताची कमतरता जाणवत नाही. सकाळच्या घाईगडबडीमध्ये मुलं शाळेत जाताना उपाशी जातात. मात्र मुलांना उपाशी पाठ्वण्यापेक्षा झटपट शेंगदाणा चाट बनवावा. चला तर जाणून घेऊया शेगदाणा चाट बनवण्याची सोपी रेसीपी.(फोटो सौजन्य – iStock)
पुरण तयार करून शिल्लक राहिलेल्या कटापासून बनवा झणझणीत कटाची आमटी, नोट करून घ्या