पेरूचे आईस्क्रीम बनवण्याची सोपी रेसिपी
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सगळ्यांचं थंड पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी कुल्फी, सरबत किंवा आईस्क्रीम आणून खाल्ले जाते. बाजारामध्ये अनेक वेगवेगळ्या फ्लेवर्सचे आईस्क्रीम उपलब्ध आहेत. कडक उन्हामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. शरीरात वाढलेल्या उष्णतेचा परिणाम आरोग्यावर दिसून येतो. त्यामुळे शरीरात थंडावा टिकवून ठेवण्यासाठी आहारात थंड पदार्थांचे सेवन करावे. मात्र नेहमी नेहमी कोलड्रिंक किंवा ज्युस पिणे आरोग्यासाठी चांगले नाही. म्हणून आज आम्ही तुम्हाला थंडगार पेरूचे आईस्क्रीम बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. पेरू हे फळ लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडते. अनेक लहान मुलं पेरूमध्ये असलेल्या बियांमुळे पेरू खाणे टाळतात. अशावेळी तुम्ही मुलांना या पद्धतीने आईस्क्रीम किंवा इतर पदार्थ बनवू खाऊ घालू शकता. चला तर जाणून घेऊया पेरूचे आईस्क्रीम बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
इडली खायची इच्छा झाली आहे? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा घरी बनवा मऊसूत खोबरं पोह्यांची इडली
उन्हाळ्यात थंडगार काकडीपासून सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट काकडीची भाजी, उपवासालाही चालेलं भाजी