दुपारच्या जेवणासाठी घरीच बनवा चमचमीत ढाबास्टाईल शेवगा मसाला
नेहमीचे साधे आणि कमी मसालेदार जेवण जेवून कंटाळा आल्यानंतर काहींना काही झणझणीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. भात, डाळ, भाजी, चपाती इत्यादी ठराविक पदार्थ रोजच्या जेवणात बनवले जातात. त्यामुळे नेहमी नेहमी काय भाजी बनवावी? अनेकदा सुचत नाही. झणझणीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर अनेक लोक हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर जाऊन जेवतात. मात्र सतत बाहेरचे तेलकट आणि तिखट जेवण खाणे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये घरी चमचमीत ढाबास्टाईल शेवगा मसाला बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत. या शेंगांमध्ये आढळून येणारे कॅल्शियम हाड आणि रोगप्रतिकारशक्ती निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. शेवग्याच्या शेंगांचा वापर करून अनेक वेगवेगळे पदार्थ देखील बनवले जातात. चला तर जाणून घेऊया चमचमीत ढाबास्टाईल शेवगा मसाला बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
सकाळच्या नाश्त्यात चहासोबत खाण्यासाठी बनवा मेथीच्या पुऱ्या, आठवडाभर टिकून राहील पदार्थ