१० मिनिटांमध्ये बनवा पालक कॉर्न चिला
थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात पालेभाज्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. पालेभाज्यांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. दैनंदिन आहारात पालेभाज्यांचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया निरोगी राहते. कॅल्शियम, विटामिन, लोह, झिंक आणि इतर जीवनसत्वे वाढवण्यासाठी आहारात पालेभाज्यांचे सेवन करावे. मेथी, पालक, मुळा, चवळी इत्यादी अनेक पालेभाज्या बाजारात उपलब्ध असतात. त्यात मोठ्या प्रमाणावर खाल्ली जाणारी भाजी म्हणजे पालक. पालकची भाजी, पालक पराठा, पनीर पालक इत्यादी अनेक प्रकार पालकपासून बनवले जातात. मात्र नेहमी नेहमी हेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन खाण्याची इच्छा निर्माण होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये पालक कॉर्न चिला बनवू शकता. चला तर जाणून घेऊया पालक कॉर्न चिला बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा