नवरात्रीत उपवासानिमित्त १० मिनिटांमध्ये झटपट बनवा रताळ्याचा हलवा
शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली आहे. देवीची घटस्थापना करून घरात पूजा केली जाते. तसेच नऊ दिवस देवीला नऊ वेगवेगळ्या गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. नैवेद्यामध्ये कधी शिरा, खीर, मालपुआ इतर कधी बासुंदी बनवून दाखवली जाते. पण आज आम्ही तुम्हाला रताळ्याचा हलवा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंवर शेअर केला आहे. ऐश्वर्या नारकर सतत काहींना काही रेसिपी आणि फॅशन टिप्स चाहत्यांसोबत शेअर करत असतात. उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी, वडा, साबुदाण्याची उसळ, रताळ्याच्या किस इत्यादी काही ठराविक पदार्थ खाल्ले जातात. पण नेहमीच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. रताळी आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक असतात. नियमित सकाळच्या नाश्त्यात रताळी खाल्ल्यास पोट भरलेले राहील आणि लवकर भूक लागणार नाही. रताळ्यामध्ये फायबर, विटामिन आणि पोषक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि आरोग्य सुधारते. जाणून घ्या रताळ्याचा हलवा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)
घाईगडबडीच्या वेळी सकाळच्या नाश्त्यात बनवा हेल्दी टेस्टी दही कबाब, पारंपरिक चवीचा पौष्टिक पदार्थ
साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्य नाश्त्यासाठी बनवा साबुदाण्याचे कस्टर्ड