झणझणीत टोमॅटोची चटणी
सकाळी घाईगडबडीच्या वेळी डब्यात भाजी काय बनवून बनवावी, असा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. दररोज कडधान्य आणि इतर भाज्या खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही टोमॅटोपासून चटणी बनवू शकता. प्रत्येक स्वयंपाक घरात टोमॅटो ही भाजी असतेच. डाळ, भाजी, खिचडी किंवा इतर कोणतेही पदार्थ बनवताना टोमॅटो हे लागतातच. त्यामुळे तुम्ही टोमॅटोपासून झणझणीत चटणी बनवू शकता. तसेच तुम्ही डब्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बनवू शकता. कारण घाईगडबडीमध्ये भाजी नसेल तर लगेच चटणी डब्यात घेऊन जाता येते. टोमॅटोची चटणी प्रत्येक ऋतूमध्ये बनवली जाते. तसेच बाजारात सुद्धा प्रत्येक ऋतूमध्ये टोमॅटो उपलब्ध असतात. टोमॅटोची चटणी केवळ चवीसाठीच नाहीतर आरोग्यासाठी सुद्धा अतिशय गुणकारी आणि पौष्टिक आहे. चला तर जाणून घेऊया टोमॅटो चटणी बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: Diwali 2024: दिवाळीत घरीच बनवा मऊ रसरशीत गुलाबजाम, जाणून घ्या परफेक्ट रेसिपी