जेवणात सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा टोमॅटो पुलाव
भात झाल्याशिवाय जेवण जेवल्यासारखे वाटतं नाही. भातासोबत डाळ, चपाती, भाजी इत्यादी पदार्थ बनवले जातात. पण अनेकदा तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात टोमॅटो पुलाव बनवू शकता. टोमॅटो पुलाव बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी साहित्यामध्ये आणि वेळात टोमॅटो पुलाव तयार होतो. टोमॅटो आरोग्याच्या दृष्टीने अतिशय पौष्टिक आणि गुणकारी आहेत. शरीरामध्ये विटामिन ची कमतरता निर्माण झाल्यानंतर आहारात टोमॅटोचे सेवन करावे. मात्र आपल्यातील अनेकांना शिजवलेला टोमॅटो खायला आवडत नाही. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये टोमॅटो पुलाव बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
सकाळच्या नाश्त्यात घरच्या घरी बनवा मटार चाट, लहान मुलांसह मोठेही खातील आवडीने