नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये गव्हाच्या पिठापासून बनवा चविष्ट कुरकुरीत डोसे
सकाळच्या नाश्त्यात नेहमीच सगळ्यांना झटपट आणि कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारे पदार्थ हवे असतात. कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही गव्हाच्या पिठाचा वापर करून कुरकुरीत डोसे बनवू शकता. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं डोसे खायला खूप आवडतात. हिरव्या चटणीसोबत किंवा चहासोबत तुम्ही डोसा खाऊ शकता. डोसा खाल्यानंतर पोटही भरते आणि लवकर भूक लागत नाही. सुप्रसिद्ध मास्टरशेफ पंकज भदौरिया या त्यांच्या इन्स्टा अकॉउंटवरून सतत काहींना काही रेसिपी शेअर करत असतात. त्यांनी सांगितलेल्या रेसिपी अतिशय कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणाऱ्या असतात. चला तर जाणून घेऊया गव्हाच्या पिठाचे डोसे बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
Weekend Special Recipe: चिकन ठेचा कधी खाल्ला आहे का? झणझणीत रेसिपी होत आहे Viral
१० मिनिटांमध्ये कोकणी पद्धतीत बनवा मऊ आणि लुसलुशीत आंबोळ्या, सकाळचा नाश्ता होईल फसक्लास