१० मिनिटांमध्ये कोकणी पद्धतीत बनवा मऊ आणि लुसलुशीत आंबोळ्या
कोकणात फिरायला किंवा इतर कोणत्याही कारणांसाठी गेल्यानंतर सगळ्यात पहिली आठवण येणारा पदार्थ म्हणजे आंबोळ्या.सकाळच्या नाश्त्यासाठी आंबोळ्या चटणी आणि काळ्या वाटण्याची भाजी बनवली जाते. तांदूळ, उडीद डाळ वापरून तयार केलेला पदार्थ कोकणासह जगभरात सगळीकडे मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे. कोकणातील खाद्यसंस्कृतीची चव घेण्यासाठी जगभरातील लाखो पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येने कोकणात येतात. मऊ, लुसलुशीत पारंपरिक पद्धतीमध्ये बनवल्या जाणाऱ्या आंबोळ्या घरातील लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातात. आंबोळ्या नाश्त्यात असतील तर चार घास जास्त नाश्ता केला जातो. आंबोळ्या खाल्यानंतर पोटही भरते आणि लवकर भूक लागत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला 10 मिनिटांमध्ये कोकणी पद्धतीत आंबोळ्या बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. घाईगडबडीच्या वेळी झटपट तुम्ही बनवू शकता. चला तर जाणून घेऊया आंबोळ्यांची रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
चहासोबत खाण्यासाठी ५ मिनिटांमध्ये बनवा चटपटीत मॅगीची भेळ, लहान मुलांसह मोठ्यांसुद्धा नक्की आवडेल
Weekend Special Recipe: चिकन ठेचा कधी खाल्ला आहे का? झणझणीत रेसिपी होत आहे Viral






