कॅन्सरचा प्रोसेस्ड फूडचा संबंध
संपूर्ण आरोग्य राखण्यासाठी जीवनशैलीची भूमिका समजून घेणे महत्त्वाचे आहे. निरोगी जीवनशैली अंगीकारण्यामध्ये आपण काय खातो याची जाणीव असणे, सुविधेपेक्षा आरोग्याला प्राधान्य देणे आणि काम करताना माहितीपूर्ण निर्णय घेणे यांचा समावेश होतो. यामध्ये हेल्दी नाश्ता, नियमित शारीरिक हालचाली आणि स्ट्रेस मॅनेजमेंट टेक्निक्स हे देखील संतुलित जीवनशैलीचे अविभाज्य भाग आहेत.
आपल्या व्यस्त दिनचर्येत अनेकदा आरोग्यापेक्षा सोयींना अधिक प्राधान्य दिले जाते. ज्यामुळे आपल्याकडून अल्ट्रा- प्रोसेस्ड पदार्थांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. हे पदार्थ तयार करायला सोपे आणि चविष्ट असले तरी, त्यात हानिकारक घटक असतात ज्यांचा आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. अलीकडील संशोधनाने अल्ट्रा- प्रोसेस्ड अन्नपदार्थ आणि विविध आरोग्य जोखीम यांच्यातील एक चिंताजनक संबंध उघड केला आहे, आणि दीर्घकालीन आरोग्यासाठी माहितीपूर्ण आहारविषयक निर्णय घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. डॉ. सुशांत इखर, सल्लागार – मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, एचसीजी कॅन्सर सेंटर, नागपूर यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – iStock)
अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्स म्हणजे काय?
अल्ट्रा प्रोसेस्ड फूड
अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्स (यूपीएफ) हे मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरित्या प्रक्रिया केलेले पदार्थ आहेत ज्यामध्ये असे घटक असतात जे सामान्यतः घरगुती स्वयंपाकात वापरले जात नाहीत. यांमध्ये अनेकदा जास्त प्रमाणात साखर, अनहेल्दी फॅट्स आणि कृत्रिम पदार्थ असतात पण त्यात पौष्टिक मूल्य कमी असते.
अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्स आणि कॅन्सर यांच्यातील संबंध
उच्च कॅलरी घनता आणि लठ्ठपणा:
अल्ट्रा- प्रोसेस्ड पदार्थांमध्ये कॅलरीज जास्त प्रमाणात असतात, ज्यामुळे जास्त खाल्ल्याने वजन वाढते. स्तन, कोलोरेक्टल आणि स्वादुपिंडाच्या कॅन्सरसह अनेक प्रकारच्या कॅन्सरसाठी लठ्ठपणा हा एक सुस्थापित जोखीम घटक आहे
हानिकारक कृत्रिम आणि दूषित पदार्थ:
अनेक अल्ट्रा- प्रोसेस्ड पदार्थांमध्ये ऍक्रिलामाइड सारखे कृत्रिम आणि दूषित पदार्थ असतात, जे तळलेल्या आणि शिजवलेल्या पदार्थांमध्ये आढळते आणि संभाव्य मानवी कर्करोगजन्य पदार्थ म्हणून वर्गीकृत केले जाते.
पौष्टिक असंतुलन:
साखर, अनहेल्दी फॅट्स आणि मीठ यांचा जास्त प्रमाणात वापर चयापचय प्रक्रियांमध्ये अडथळा आणू शकतात आणि त्यामुळे जळजळ होऊ शकते. दीर्घकाळ जळजळ होणे हे कॅन्सर होण्यास कारणीभूत असू शकते.
आतड्यांवरील मायक्रोबायोटावर परिणाम:
अल्ट्रा- प्रोसेस्ड पदार्थ आतड्यांवरील मायक्रोबायोटाची रचनेत बदल करून आतड्याच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात.
अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्सशी संबंधित कॅन्सरचे प्रकार:
कॅन्सरचे प्रकार
कोलोरेक्टल कॅन्सर: प्रक्रिया केलेले मांस आणि इतर अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थ प्रक्रियेदरम्यान तयार होणाऱ्या नायट्रोसेमाइन्स सारख्या हानिकारक संयुगांमुळे कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका वाढवतात याचे ठोस पुरावे आहेत.
स्तनाचा कॅन्सर: शर्करायुक्त पदार्थ आणि शीतपेये यांचे जास्त सेवन, ज्यांना बऱ्याचदा अल्ट्रा-प्रोसेस्ड म्हणून वर्गीकृत केले जाते, विशेषत: रजोनिवृत्तीनंतरच्या महिलांमध्ये स्तनाच्या कॅन्सरच्या वाढत्या जोखमीशी संबंधित असल्याचे आढळून आले आहे.
पोटाचा कॅन्सर: मीठ जास्त असलेले प्रक्रिया केलेले पदार्थ, जसे की पॅक केलेले स्नॅक्स आणि प्रक्रिया केलेले मांस, यामुळे पोटाच्या कॅन्सर होण्याचा धोका वाढू शकतो. जास्त प्रमाणात मिठाचे सेवन पोटाच्या अस्तरांना नुकसान पोहोचवू शकते आणि, पोटाच्या कॅन्सरशी संबंधित हेलिकोबॅक्टर पायलोरी बॅक्टेरियाच्या वाढीस कारणीभूत ठरू शकते.
हेदेखील वाचा – 40 नंतर पुरुषांना स्वतःकडे लक्ष देणे गरजेचे, 5 प्रकारच्या कॅन्सरचा वाढतोय धोका
जोखीम कमी करण्यासाठी
या गोष्टी पाळाव्यात
अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड आणि कॅन्सर यांच्यातील संबंधाचा वाढता पुरावा लक्षात घेता, अशा आहाराच्या सवयी अंगीकारणे गरजेचे आहे जेणेकरून अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडचा वापर कमीत कमी करता येईल. कॅन्सरचा धोका कमी करण्याची काही प्रॅक्टिकल स्टेप्स खाली दिले आहेत:
संपूर्ण अन्नाला प्राधान्य द्या: फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, नट आणि बिया यासारखे संपूर्ण, प्रक्रिया न केलेले पदार्थ खाण्यावर भर द्या.
फूड लेबल्स वाचा: अति-प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ ओळखण्यासाठी फूड लेबल्स काळजीपूर्वक वाचा. ऍडिटीव्ह, प्रिझर्व्हेटिव्ह आणि कृत्रिम फ्लेवर्ससह घटकांची लांबलचक यादी असलेले प्रोडक्ट टाळा.
अन्न घरी शिजवा: घरी जेवण तयार केल्याने पदार्थांवर आणि स्वयंपाक करण्याच्या पद्धतींवर नियंत्रण ठेवता येते. घरी शिजवलेले अन्न सामान्यतः आरोग्यदायी असते आणि त्यात हानिकारक पदार्थ नसतात.
साखर आणि प्रक्रिया केलेले स्नॅक्सचे सेवन कमी करा: ताजी फळे, नट आणि दही यांसारख्या हेल्दी स्नॅक्सची निवड करा. साखरयुक्त पेयांचे सेवन कमी करा आणि त्याऐवजी पाणी, हर्बल टी किंवा घरी बनवलेली स्मूदी प्या.
स्वतःला शिक्षित करा: अल्ट्रा- प्रोसेस्ड खाद्यपदार्थांशी संबंधित संभाव्य आरोग्य धोक्यांबद्दल जागरूक रहा. हेल्दी खाण्याच्या सवयींना प्रोत्साहन देणाऱ्या सामुदायिक कार्यक्रमांमध्ये आणि उपक्रमांमध्ये सहभागी व्हा.
निष्कर्ष:
अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थांची सुविधा आणि व्यापक उपलब्धता यामुळे ते अनेक आहारांचे मुख्य भाग बनले आहे. तथापि, या पदार्थांचा कॅन्सरशी संबंध जोडणारा वाढता पुरावा आपल्या आहारातील निवडींचे पुनर्मूल्यांकन करण्याची तातडीची गरज अधोरेखित करतात. अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्स काय आहेत हे समजून घेऊन आणि त्यांचे संभाव्य आरोग्य धोके ओळखून, आपण आपल्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी अधिक माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतो. संपूर्ण, प्रक्रिया न केलेल्या अन्नपदार्थांवर भर दिल्यास आणि आरोग्यदायी खाण्याच्या सवयींचा अवलंब केल्याने कॅन्सरचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो आणि एकूणच आरोग्य सुधारू शकते.