दिवसेंदिवस सूर्य आपली आग ओकत आहे. गर्मीमुळे सगळेच त्रस्त होताना दिसत आहेत. तर अनेकांना उष्माघाताचा प्रचंड त्रास होताना दिसत आहे. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी वाढवणे गरजेचं आहे. उष्णतेमुळे शरीरातील पाणी झपाट्याने कमी होते. म्हणून काळजी घ्या. नाहीतर उष्णतेचे अनेक विकार सुरू होतील. त्यासाठी खाण्यापिण्यावरही लक्ष देणं गरजेचं आहे. शरिरासाठी कोणते पदार्थ थंड आणि उष्ण आहेत याची माहिती असणे आवश्यक आहे.






