काय नेमकं प्रकरण?
पवन निंबाळकर असे या पीएसआय चे नाव आहे. याचे एका बीड जिल्ह्यातील तरुणी सोबत लग्न जुडले होते. मुलीच्या आई-वडिलांनी आयुष्यभराची कमाई, दागिने, कपडे, साखरपुडा आणि लग्नाच्या तयारीवर खर्च केले. फक्त अक्षता पडण्याचे बाकी होते.मात्र शेवटी त्यांच्या पदरी आली की फक्त फसवणूक आणि बदनामी. ऐनवेळी या पीएसआय ने लग्नाला नकार दिल्याने मुलीच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
Raigad Crime: रायगड हादरला! खालापूरमध्ये वृद्ध दाम्पत्याची गळा चिरून निर्घृण हत्या
मुलीच्या आई-वडिलांनी पीएसआय आणि त्याच्या कुटुंबीयांची समजूत काढण्यासाठी त्याच्या गावी गेले होते. मात्र त्यावेळी तुमची जर लग्न करायची इच्छा असेल आणि दहा लाख रुपये हुंडा द्या अशी मागणी पीएसआय आणि त्याच्या कुटुंबीयांनी केली. हे ऐकून मुलीच्या कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली.
यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी पोलीस ठाणे गाठले. त्यांच्यासोबत घडलेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. या घटनेने मुलीच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे त्यांनी आता या प्रकरणी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे.
अवघ्या १२ दिवसांत संसार संपला! नवविवाहित तलाठ्याची गळफास घेऊन आत्महत्या
बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नवविवाहित तलाठी तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात घडली. त्या तरुणाची पत्नी ड्युटीवर गेली असताना त्याने भाड्याच्या खोलीत असलेले लोखंडी हूकाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव गणेश दत्तू कोळी असे आहे. ते चंद्रपूर महोत्सव विभागात तलाठी पदावर कार्यरत होते. तर त्यांची पत्नी अंबाजोगाई येथील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील फॉरेन्सिक विभागात कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहे. अवघे बारा दिवसांपूर्वीच मृत गणेश कोळी यांचा विवाह झाला होता. हे दोघेही अंबाजोगाईतील मोरेवाडी या ठिकाणी भाड्याने खोली घेऊन राहत होते.
चारचाकीच्या धडकेत महिला गंभीर जखमी, दोन्ही पाय अन् हात फ्रॅक्चर; अपघातानंतर चालक फरार
Ans: पवन निंबाळकर नावाच्या PSIवर आरोप करण्यात आले आहेत.
Ans: हुंड्यासाठी लग्न मोडून फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.
Ans: चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे.






