तांदळाच्या पाण्याचे आईस क्यूब बनवण्याची सोपी कृती:
सर्वच महिला त्वचेची खूप जास्त काळजी घेतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी स्किन केअर रुटीन फॉलो करून आहारात बदल केला जातो. ज्यामुळे त्वचा अधिक सुंदर आणि उठावदार दिसते. मात्र काहीवेळा चुकीच्या प्रॉडक्टचा वापर त्वचेसाठी केल्यामुळे त्वचेची गुणवत्ता अधिकच खराब होऊन जाते. पिंपल्स, ऍक्ने, मुरूम, मोठं मोठे फोड इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे रोजच्या स्किन केअर रुटीन त्वचेला सूट न होणाऱ्या प्रॉडक्टचा वापर करू नये. यामुळे त्वचा अधिकच खराब होऊन जाते. सुंदर दिसण्यासाठी अनेक महिला आणि मुली बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या क्रिम्सचा वापर करतात. मात्र या क्रीम्स काहीकाळ त्वचेवर ग्लो आणतात. पण पुन्हा एकदा त्वचा होती तशीच होऊन जाते. त्यामुळे खराब झालेली त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करत त्वचेची काळजी घ्यावी. यामुळे त्वचेची गुणवत्ता सुधारेल आणि चेहरा उजळदार दिसू लागेल.(फोटो सौजन्य – iStock)
घरगुती पदार्थांचा वापर त्वचेसाठी केल्यास त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर आणि उठावदार दिसू लागेल. तांदळाच्या पाण्याचा वापर कोरियन स्किन केअर रुटीनमध्ये केला जातो. कोरियन स्किन केअर रुटीनमध्ये वेगवेगळ्या पदार्थांचा वापर केला जातो. मात्र या प्रॉडक्टची किंमत महाग असल्यामुळे महिला कोरियन स्किन केअर रुटीन फॉलो करत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला तांदळाच्या पाण्याचा वापर करून कोरियन महिलांप्रमाणे सुंदर आणि चमकदार त्वचा कशी करावी? तांदळाच्या पाण्याचे आईस क्यूब बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
तांदळाच्या पाण्याचा वापर करून आईस क्यूब तयार करण्यासाठी सर्वप्रथम, अर्धावाटी तांदूळ घेऊन स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर वाटीभर पाण्यात रात्रभर तांदूळ भिजत ठेवा. तांदूळ व्यवस्थित भिजल्यानंतर सकाळी उठल्यानंतर टोपात पाणी घेऊन गरम करून घ्या. त्यानंतर त्यात तांदूळ टाकून व्यवस्थित उकळवून घ्या. त्यानंतर तांदळाचे पाणी गाळून पाण्यामध्ये विटामिन ई कँप्सूल मिक्स करून घ्या. मिक्स करून घेतल्यानंतर बर्फाच्या ट्रेमध्ये पाणी ओतून फ्रिजमध्ये ठेवा. बर्फाचे तुकडे तयार झाल्यानंतर नियमित एक बर्फाचा तुकडा चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा.
तांदळाच्या पाण्यात असलेले गुणधर्म त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे. या पाण्यात अॅंटी-एजिंग आणि अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात. त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर तांदळाच्या पाण्याचा वापर करा. चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो आणण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा वापर करावा. पिंपल्समुळे खराब झालेली त्वचा सुधारण्यासाठी आणि चेहऱ्यावर टॅन घालवण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा वापर करावा.