Mental Health: तणाव कमी करण्यासाठी करा ‘या’ सोप्या गोष्टी, मानसिक आरोग्य सुधारेल
इंटरमिटंट फास्टिंग हा कोणता विशिष्ट आहार नसून खाण्याची एक पद्धत आहे. यामध्ये ठराविक कालावधीत अन्न सेवन केले जाते आणि उर्वरित वेळ उपवास केला जातो. सर्वाधिक लोकप्रिय पद्धतींमध्ये १६:८ नियमाचा समावेश होतो. यामध्ये १६ तास उपवास केला जातो आणि ८ तासांच्या कालावधीत जेवण घेतले जाते.
उपवासाच्या काळात शरीर साठवलेल्या चरबीचा ऊर्जा म्हणून वापर करू लागते. त्यामुळे वजन आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळू शकते.
काही अभ्यासांनुसार इंटरमिटंट फास्टिंगमुळे इन्सुलिन सेसिंटिव्ह सुधारू शकते, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
सतत खाण्याऐवजी ठराविक वेळ उपवास केल्याने पचनसंस्थेला विश्रांती मिळते आणि पचनक्रिया अधिक कार्यक्षम होऊ शकते.
कोलेस्टेरॉल, रक्तदाब आणि शरीरातील दाह कमी करण्यास मदत झाल्यास हृदयविकारांचा धोका कमी होऊ शकतो.
काही लोकांच्या अनुभवांनुसार इंटरमिटंट फास्टिंगमुळे एकाग्रता, मानसिक सतर्कता आणि ऊर्जेची पातळी सुधारू शकते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Money Plant: घरातील मनी प्लांट सुकतोय? वापरा ‘या’ सोप्या टिप्स, होईल हिरवेगार






