डोळ्यांना भास की तात्पुरता ताण? जाणून घ्या काय आहे ‘स्यूडो-मायोपिया’
IBS हा आतडे आणि मेंदू यांच्यातील बिघडलेल्या समन्वयामुळे उद्भवणाऱ्या दीर्घकालीन पचनविकार आहे. या आजारामध्ये पोटात वारंवार दुखणे, शौचाच्या सवयींमध्ये बदल होणे, अतिसार, बद्धकोष्ठता किंवा दोन्ही समस्या आळीपाळीने होऊ शकतात. हा आजार आतड्यांचे कायमस्वरूपी नुकसान करत नाही, मात्र रुग्णाच्या जीवनमानावर त्याचा परिणाम होऊ शकतो.
IBS असलेल्या व्यक्तींमध्ये पोटात क्रॅम्प येणे, वारंवार पोटदुखी, पोट फुगणे, गॅस होणे, अतिसार किंवा बद्धकोष्ठता, तसेच शौचाच्या सवयींमध्ये सतत बदल होणे ही सामान्य लक्षणे दिसून येतात. काही रुग्णांना शौचानंतरही पूर्णपणे पोट साफ न झाल्याची भावना जाणवू शकते. ही लक्षणे काही कधी कधी जास्त त्रासदायक होऊ शकतात.
सततचा ताण, चिंता, अनियमित आहार, झोपेची कमतरता आणि काही विशिष्ट पदार्थांमुळे IBS ची लक्षणे वाढू शकतात. महिलांमध्ये हा त्रास तुलनेने अधिक दिसून येतो. काही रुग्णांमध्ये मसालेदार पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ किंवा कॅफिनयुक्त पेयेही लक्षणे वाढवू शकतात.
IBS वर कायमस्वरूपी उपचार नसले तरी योग्य आहार, नियमित व्यायाम, ताण-तणाव नियंत्रण, पुरेशी झोप आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार केल्यास लक्षणांवर नियंत्रण मिळवता येते. लक्षणे वारंवार दिसत असल्यास स्वतःहून औषधे घेण्याऐवजी गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
जर पोटदुखीसोबत वजन झपाट्याने कमी होणे, शौचातून रक्त येणे, सतत तीव्र वेदना किंवा इतर गंभीर लक्षणे दिसत असतील, तर त्वरित वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे आहे. वेळेवर निदान आणि योग्य उपचारांमुळे IBS मुळे होणारा त्रास मोठ्या प्रमाणात कमी करता येतो.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
भारतातील सर्वात ‘हॉन्टेड’ बीच! काळी वाळू, भुतांच्या कथा अन्…; सूर्य मावळताच का घाबरतात पर्यटक?






