बाळांना गुदगुल्या केल्याने त्रास होतो का? (फोटो सौजन्य - iStock)
लहान मुलांबद्दल प्रेम वाटणे सामान्य आहे. बरेच लोक त्यांना हसवण्यासाठी गुदगुल्या करतात. बहुतेक लोक असे मानतात की मुलांना हसवण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की असे केल्याने फक्त आनंदच नाही तर मुलाला गंभीर नुकसानदेखील होऊ शकते?
हो तुम्ही योग्य वाचलं आहे. खरंतर आपण आजपर्यंत अनेकदा बाळांना गुदगुदल्या केल्या आहेत. पण यामुळे बाळाला त्रास होत असेल हा विचार कधीच कोणाच्या मनात आला नसेल. पण आरोग्य तज्ज्ञांकडून जाणून घेऊया की लहान मुलांना गुदगुल्या का करू नयेत आणि ते त्यांच्यासाठी कसे हानिकारक असू शकते.
मुलांना संस्कारी आणि यशस्वी बनविण्यासाठी Nita Ambani च्या 5 पॅरेंटिंग टिप्स ठरतील 100 टक्के योग्य
मुलाला गुदगुल्या करणे योग्य का नाही?
डॉ. मनन व्होरा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर यासंदर्भात एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये, डॉक्टर स्पष्ट करतात की जेव्हा आपण मुलाला गुदगुल्या करतो तेव्हा ते मोठ्याने हसतात. परंतु हे हास्य बहुतेकदा शरीराची प्रतिक्षेप क्रिया किंवा नैसर्गिक प्रतिक्रिया असते. याचा अर्थ असा नाही की मूल खरोखर आनंदी आहे. खरंतर डॉक्टरांनी सांगितले की, बाळाला गुदगुदल्या करणे योग्य नाही.
मुलाच्या शरीरावर गुदगुल्या झाल्यावर काय होते?
गुदगुदल्या करणे धोकादायक का असू शकते?
डॉक्टर म्हणतात की या स्थितीत, मूल त्यांना कसे वाटते ते तोंडी व्यक्त करू शकत नाही. ते बाहेरून हसत असतील, परंतु त्यांच्या शरीरात चिंता आणि अंतर्गत ताण जाणवू शकतो. हे जास्त वेळ केल्याने मुलामध्ये असुरक्षितता किंवा भीतीची भावना देखील निर्माण होऊ शकते. म्हणून, विशेषतः लहान बाळांना गुदगुल्या करणे टाळा. लहान बाळांना हसवायचे असेल तर तुम्ही त्यांना गाणे म्हणून दाखवणे, त्यांच्याशी बोलणे, त्यांच्यासमोर खेळणे आणि तुम्ही हसून दाखवणे असे पर्याय निवडू शकता. तुमच्या चेहऱ्यावरील हावभाव बघून बाळ नक्कीच हसू शकते. त्यासाठी त्यांना गुदगुल्या करायची अजिबात गरज नाही.
Parenting Tips: तुमची मुलं होतील अधिक युनिक, पालकांनी फॉलो करा या टिप्स
डॉ. मनन व्होराचा व्हिडिओ पहा






