वारंवार पोटात दुखत? पावसाळ्यात उद्भवू शकते कावीळची समस्या
राज्यासह संपूर्ण देशभरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पाऊस पडण्यास सुरुवात झाल्यानंतर सगळीकडे वातावरणात अनेक बदल दिसून येतात. या दिवसांमध्ये साथीच्या आजरांची मोठ्या प्रमाणावर लागण होते. साथीचे आजार पसरू लागल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती हळूहळू कमकुवत होऊन जाते. त्यामुळे या दिवसांमध्ये आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. कावीळ झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती कामुकवात होऊन जाते. ज्यामुळे सतत चक्कर येणे, अशक्तपणा वाटणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. काविळ म्हणजे पीलिया लिव्हरसंबंधित आजार. कावीळ झाल्यानंतर डोळ्यांखाली पांढरा आणि पिवळ्या रंगाची त्वचा दिसू लागते. याशिवाय शरीरामध्ये बिलीरूबिन नावाच्या पिवळ्या घटकाची वाढ होते. कावीळ झाल्यानंतर डोळे देखील पिवळे पडू लागतात.(फोटो सौजन्य – iStock)
शरीरात वाढलेले बिलीरूबीन पित्तामध्ये मिक्स होते आणि संपूर्ण शरीराच्या पचनक्रियेमध्ये जाते. प्रामुख्याने ते विष्ठेच्या माध्यमातून शरीरातून बाहेर पडून जाते. पण शरीरात साचून राहिलेले बिलीरूबीन लिव्हर आणि पित्त नलिकांमधून लवकर बाहेर पडून गेले नाहीतर शरीरात रक्तामध्ये जमा होऊ लागते. तसेच डोळे, त्वचा, नख इत्यादी शरीराचे अवयव पिवळे दिसू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कावीळ झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात? यावर कोणते उपाय करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे उपाय केल्यास शरीरात जमा झालेली कावीळ कमी होईल.
पावसाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कावीळ होण्यामागे अनेक कारणे आहेत. गोळ्या औषधांचे सेवन, जेनेटिक मेटाबोलिज्म डिसऑर्डर, पित्ताशयात स्टोन किंवा सूज, पित्ताशयाचा कॅन्सर, अग्नाशयाचा कॅन्सर, डायबिटीस, लठ्ठपणा, नॉन-अल्कोहल फॅटी लिव्हर इत्यादी गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर शरीरात कावीळ जमा होण्यास सुरुवात होते.
दैनंदिन आहारात शरीराला आवश्यक असलेल्या सर्वच पदार्थांचे नियमित सेवन करावे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. आहारात प्रोटीन, फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास तात्काळ आराम मिळेल. प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्यामुळे एंझाइमची निर्मिती चांगली होते. ज्यामुळे शरीरात हार्मोन्स संतुलित राहतात. लिव्हरच्या निरोगी आरोग्यासाठी आहारात फायबरयुक्त पदार्थांचे मोठ्या प्रमाणावर सेवन करावे. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन करावे.
निरोगी आरोग्यासाठी शरीराला सर्वच विटामिनची आवश्यकता असते. विटामिन सी शरीर आणि त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत करते. आंबट फळांमध्ये इलेक्ट्रोलाइट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात, ज्यामुळे शरीर कायम हायड्रेट राहते. जांभळं, पपई, अॅवोकाडो, खरबूज आणि द्राक्ष इत्यादी आंबट फळांचे नियमित सेवन करावे.