(फोटो सौजन्य: Pinterest)
आलिया भट्ट ही बॉलिवूडमधील सर्वात फिट आणि हेल्दी जीवनशैली जपणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या आहारात हलके, पौष्टिक आणि घरगुती पदार्थांचा नेहमी समावेश असतो. शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातही ती स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देते. गोव्यामध्ये चित्रिकरण करत असताना तिने नेहमी खाल्लेला पदार्थ म्हणजे तिचा आवडता बीटरूट सॅलड. गरम हवामानात थंड, हलके आणि शरीराला उर्जा देणारे हे सॅलड तिच्यासाठी परिपूर्ण पर्याय ठरले. या सॅलडमध्ये दही, मसाले आणि तडका यांचा अप्रतिम संगम आहे, ज्यामुळे त्याची चव भारतीय पारंपरिक पद्धतीने वाढते.
पार्टी स्नॅक्ससाठी परफेक्ट! कमी वेळेत तयार होणारे हाय प्रोटीन ‘सोया पकोडे’ एकदा घरी नक्की बनवून पहा
बीटरूट म्हणजे एक पौष्टिक मूळभाजी आहे. यात लोह, कॅल्शियम, फायबर आणि अनेक जीवनसत्वे असतात. यामुळे रक्तशुद्धी होते, त्वचा उजळते आणि शरीराला ताजेपणा मिळतो. अलिया भट्टसारख्या फिटनेसप्रेमी व्यक्तींसाठी हे सॅलड म्हणजे नैसर्गिक उर्जेचा स्रोत आहे. तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. चला तर पाहूया तिची आवडती बीटरूट सॅलड रेसिपी कशी करायची. जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
कृती






