गर्भाशयात गाठ असल्यास अशा पद्धतीने घ्या आरोग्याची काळजी
जीवनशैलीमध्ये सातत्याने होणाऱ्या बदलांचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. महिलांना मानसिक आणि शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. मासिक पाळीमधील वेदना, कुटुंबिक समस्या, कामाचा तणाव इत्यादी गोष्टींमुळे महिलांना आरोग्याकडे लक्ष द्याला वेळ भेट नाही. पण असे न करता कामाच्या धावपळीमधून स्वतःसाठी वेळ देणे फार गरजेचे आहे. सतत काम करत राहिल्यामुळे शरीरात थकवा जाणवतो. चुकीची जीवनशैली आणि कामाच्या तणावांमुळे महिलांचे आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते. त्यात महिलांमध्ये सामान्यपणे दिसून येणारी समस्या म्हणजे गर्भाशयातील गाठ.
महिलांच्या गर्भाशयात गाठ झाल्यानंतर आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते. चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम महिलांच्या शारीरिक आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे महिलांनी आरोग्याची काळजी घेऊन निरोगी जीवन जगले पाहिजे. गर्भाशयात गाठ झाल्यानंतर अनेक समस्या उद्भवतात. ही समस्या उद्भवल्यानंतर आरोग्याची कशी काळजी घ्यावी, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: ऑफिसमधील टॉक्सिक वातावरणाशी दोन हात करण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा
गर्भाशयात गाठ झाल्यानंतर महिलांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य बिघडून जाते. गर्भाशयात प्रामुख्याने फायब्रॉईडची गाठ होतात. या गाठी झाल्यानंतर महिलांना खूप जास्त त्रास होतो. काहीवेळा ही गाठ कर्करोगाची आहे की याची तपासणी सुद्धा करून घ्यावी लागते. गर्भाशयात गाठ झाल्यानंतर महिलांना मासिक पाळीमध्ये वेदना होण्यास सुरुवात होते. पाळीमध्ये अनियमितता तसेच गर्भाशय खाली आल्यासारखे वाटते. हल्ली चुकीच्या जीवनशैलीमुळे तरुण वयाच्या मुलींमध्येसुद्धा हा आजार दिसून आला आहे.
गर्भाशयात गाठ झाल्यानंतर महिलांनी नियमित व्यायाम करावा. तसेच वजन वाढणार नाही याची काळजी घ्यावी. गर्भाशयात गाठ झाल्यानंतर वजन वाढू लागते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. वजन वाढल्यानंतर आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम दिसून येतात.
हे देखील वाचा: जास्त प्रमाणात हळद खाल्ल्याने शरीराचे होते नुकसान
आरोग्याची काळजी घेण्यासाठी महिलांनी पौष्टिक आणि सकस आहार घेतला पाहिजे. आहारात फळे, पालेभाज्या इत्यादी पदार्थांचे सेवन केले पाहिजे. ज्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. महिलांमध्ये मधुमेह आणि थायरॉईड यांसारखी लक्षणे दिसू लागल्यानंतर आरोग्याची योग्य ती काळजी घेतली पाहिजे.