हँड ड्रायर्स वापरण्याचे फायदे तोटे (फोटो - istockphoto)
आपण चित्रपट पाहण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी थिएटर आणि मॉलमध्ये जात असतो. त्या ठिकाणी आपण जेव्हा पब्लिक वॉशरूम वापरतो. तेव्हा हात धुतल्यानंतर पुसण्यासाठी टिशू पेपर ऐवजी हँड ड्रायर्स वापरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हँड ड्रायर्समधून येणारी गरम हवा आपले ओले हात वाळवण्यास फायदेशीर ठरतात. मात्र याचा जास्त वापर करणे हे आरोग्याला त्रासदायक ठरू शकतात. याबबद्दल अधिक जाणून घेऊयात.
पब्लिक वॉशरूममध्ये हात धुतल्यानंतर अति प्रमाणात हँड ड्रायर्सकहा वापर केल्यास काही आर होण्याची शक्यता असते. जास्त प्रमाणात हँड ड्रायर्सचा वापर केल्याने अनेक प्रकारचे संसर्ग किंवा त्वचेशी सबंधित आजार होण्याचा धोका उद्भवतो. त्यामुळे हँड ड्रायर्स वापरण्याचे फायदे तोटे जाणून घेऊयात.
बॅक्टेरियाचा धोका
तज्ञांच्या मते अनेक जण सार्वजनिक ठिकाणी हँड ड्रायर्सचा वापर करतात, तेव्हा तिथे बॅक्टेरिया जमा होण्याचा धोका जास्त असतो. हँड ड्रायरच्या गरम हवेमध्ये टॉयलेट शीटपेक्षा जास्त बॅक्टेरिया असतात.
श्वासासबंधी आजार
हँड ड्रायर्सच्या गरम हवेत आजूबाजूची धूळ, किटाणू जमा होतात. त्यामुळे दमा किंवा ऍलर्जी असलेल्या लोकांची प्रकृती बिघडण्याची शक्यता असते.
त्वचेशी संबंधित आजार
आपण आपले हात वाळवण्यासाठी आपण हँड ड्रायर वापरतो. तेव्हा ती गरम हवेमुळे आपल्याला त्वचेसंबंधित आजार होऊ शकतात. रॅशेज आणि ऍलर्जीचा त्रास होऊ शकतो.
हात सुखवण्यासाठी दुसरे पर्याय काय?
1. रूमालाचा वापर करावा.
2. टिशू पेपरचा वापर करावा.