कोणत्याही सणसमारंभात आपल्याला तांब्याच्या भांड्यांची गरज भासत असते. आजकाल अनेकजण आपल्या घरात तांब्याच्या भांड्यांचा वापर करत असतात. अनेक रेसिपीच्या व्हिडिओजमध्येही तांब्याच्या भांड्यांचा प्रामुख्याने वापर केलेला दिसून येतो. धार्मिक मान्यतेनुसार, तांब्यांच्या भांड्यांना विशेष महत्त्व आहे. पूजेतदेखील तांब्याची भांडी वापरली जातात. तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. रोज सकाळी तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात.
मात्र तांब्याची भांडी वापरणे तितके सोपे आणि यांना नियमित स्वछ न केल्याने यांवर घाण, चिवट काळे डाग पडू लागतात. अनेकजण आपल्या रोजच्या वापरात तांब्याच्या भांड्यांचा वापर करत नाहीत. अशात यांवर कितीतरी दिवसांचा मळ साठू लागतो. तांब्याच्या भांड्यांना व्यवस्थित स्वछ न करता यांचा वापर केल्यास आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला काही घरगुती गोष्टींचा वापर करून तुम्ही तांब्याची भांडी कशी स्वछ आणि चमकदार बनवू शकता याविषयी सांगणार आहोत.
हेदेखील वाचा – एका रात्रीत चेहऱ्यावरील सुरकुत्या होतील नाहीशा, हा घरगुती पदार्थ करेल तुमची मदत
मीठ आणि व्हिनेगर
वर्षांनुवर्षे जुनी तांब्याची भांडी स्वछ करण्यासाठी तुम्ही मीठ आणि व्हिनेगरचा वापर करू शकता. यासाठी एका वाटीत थोडे आणि व्हिनेगर टाकून याचे व्यवस्थित एक मिश्रण तयार करा. आता कापसाचा गोळा घेऊन या द्रावणात मिक्स करा आणि याने चिवट घाण तांब्याची भांडी साफ करा. तुम्ही जास्त द्रावण बनवून यात ही भांडी काहीवेळ बुडवून देखील ठेवू शकता. याच्या मदतीने काही क्षणातच तुमची तांब्याची भांडी नव्यासारखी चमकू लागतील.
हेदेखील वाचा – तुटणे, गळणे आणि कोरड्या केसांसाठी घरीच तयार करा भृंगराज तेल
मीठ आणि लिंबू
तांब्याची भांडी चमकवण्यासाठी तुम्ही मीठ आणि लिंबाचा वापर करू शकता. यासाठी एक चमचा लिंबाच्या रसात अर्धा चमचा मीठ टाका आणि मिक्स करा. ही भांडी गरम पाण्यात धुतल्याने भांडी अधिक चांगली स्वछ होतात.
बेकिंग पावडर आणि डिटर्जंट
तांब्या-पितळेची भांडी साफ करण्यासाठी तुम्ही बेकिंग पावडर आणि डिटर्जंटचा वापर करू शकता. यासाठी दोन्ही साहित्य पाण्यात एकत्र करून एक मिश्रण तयार करा आणि यात भांडी काहीवेळ भिजवून ठेवा. नंतर भांडी स्वछ घासून घ्या. यामुळे तुम्हाला भांड्यांवरील मळ काढण्यासाठी अधिक मेहनत घेण्याची गरज भासणार नाही. या उपायाने सहजतेने तांब्याची भांडी चकचकीत साफ होतील.