कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खावे हे महागडे फळ
उच्च कोलेस्ट्रॉल आपल्यासाठी खूप धोकादायक आहे. ते रक्तवाहिन्यांना चिकटते आणि रक्तप्रवाह रोखते. जेव्हा रक्तप्रवाह कमी असतो तेव्हा हृदयापर्यंत कमी रक्त पोहोचते आणि त्यामुळे आपल्या जीवाला धोका निर्माण होतो. यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येऊ शकतो. म्हणून, रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करणारे आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवणारे पदार्थ सेवन करावेत. अॅवोकॅडो हे उत्तर आहे. अॅवोकॅडो हे एक अद्भुत फळ आहे. त्यात मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड असतात, जे ‘चांगले’ एचडीएल कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवतात आणि ‘वाईट’ एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करतात.
अॅवोकॅडो हृदयाचे कार्य सुधारते आणि रक्तातील कोलेस्टेरॉलचे संतुलन राखण्यास मदत करते. एवोकॅडोमध्ये पोटॅशियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स देखील असतात जे रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि धमनी आरोग्यास प्रोत्साहन देण्यास मदत करतात. नियमितपणे अॅव्होकॅडोचे सेवन केल्याने हृदयाशी संबंधित धोके कमी होतातच, शिवाय त्याचे इतरही अनेक फायदे आहेत (फोटो सौजन्य – iStock)
अॅवोकॅडो कोलेस्टेरॉल कसे कमी करते?
अवाकाडोचा कसा होतो शरीराला फायदा
इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार, 2021 मध्ये एक अभ्यास करण्यात आला होता ज्यामध्ये असे म्हटले होते की अॅवोकॅडो खाल्ल्याने उच्च कोलेस्ट्रॉलचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. हे कोलेस्टेरॉलला धमन्यांमध्ये चिकटू देत नाही. खरं तर, अॅवोकॅडोमध्ये असलेले गुणधर्म कोलेस्टेरॉलचे जलद चयापचय करतात ज्यामुळे ते लवकर उर्जेमध्ये रूपांतरित होते असे या अभ्यासात सांगण्यात आले आहे.
शरीरात जमा झालेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल भस्मसात करतील 5 पदार्थ, कोपऱ्यापासून होईल नष्ट
काय म्हणतात तज्ज्ञ
सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, मुंबई येथील पोषणतज्ञ आणि आहारतज्ज्ञ डॉ. आयलिन कांदे म्हणतात की, अॅवोकॅडो हा मोनोसॅच्युरेटेड डी फॅटचा चांगला स्रोत आहे. हे फळ हृदयाच्या पेशींमध्ये जळजळ होऊ देत नाही, ज्यामुळे हृदयाचे रोग कमी करण्यास मदत मिळते. एवढेच नाही तर, अॅवोकॅडोमध्ये व्हिटॅमिन के, फोलेट, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि ई यासह अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात जे हृदयाच्या ऊतींच्या दुरुस्तीसाठी खूप उपयुक्त आहेत.
पोटाची चरबीदेखील कमी होईल
पोटाची चरबी कमी करण्यासाठी ठरते उपयोगी
अहवालानुसार, अॅवोकॅडोमुळे पोटाची चरबीदेखील कमी करता येते. हे अभ्यासातही सिद्ध झाले आहे. अभ्यासानुसार, अॅवोकॅडो पोटातील चरबी जलद गतीने चयापचय करते. तसेच, ते तुम्हाला बराच वेळ भूक लागू देत नाही. जर लोकांना कमी भूक लागली तर ते कमी जेवतील ज्यामुळे वजन वाढणार नाही. अभ्यासात असे आढळून आले की कोलेस्टेरॉलचे सेवन काही आठवड्यांत पोटाची चरबी कमी करते. त्यामुळे नाश्त्यात नियमित अॅवोकॅडोचा समावेश करून घेण्याचा सल्लाही अनेक डाएटिशियन देत असल्याचे हल्ली दिसून येते
साखर कमी करण्यासदेखील उपयुक्त
डॉ. आयलिन यांच्या मते, एवोकॅडोमध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅट असते जे कॅलरीज आणि चरबी कमी करते. एवढेच नाही तर ते इन्सुलिन वाढवण्यास देखील मदत करते. त्यात आहारातील फायबर असते जे साखरेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी करते. डायबिटस असणाऱ्या व्यक्तींसाठी अॅवोकॅडो आहारात समाविष्ट करून घेणे उपयोगी ठरते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.