चमकदार केसांसाठी घरगुती पदार्थांचा वापर करून बनवा हेअरमास्क
सर्वच महिलांना चमकदार आणि सुंदर केस हवे असतात. केसांच्या वाढीसाठी महिला सतत काहींना काही करत असतात. मात्र तरीसुद्धा केसांच्या वाढीमध्ये कोणताच बदल दिसू येत नाही. उन्हाळ्यात त्वचेसह केस सुद्धा अधिक कोरडे आणि निस्तेज होऊन जाते.केस निस्तेज झाल्यानंतर कोणतीही हेअर स्टाईल केली तरी केस सुंदर दिसत नाहीत. त्यामुळे केसांच्या वाढीकडे योग्य लक्ष देणे आवश्यक आहे. अनेक महिला केस चमकदार आणि सुंदर करण्यासाठी वेगवेगळ्या हेअर ट्रीटमेंट, हेअर मास्क, हेअर केअर प्रॉडक्ट इत्यादी अनेक गोष्टींचा वापर केला जातो. मात्र तरीसुद्धा केसांमध्ये कोणताच फरक दिसून येत नाही. केसांच्या निरोगी वाढीसाठी केसांना आतून वरून पोषण देण्याऐवजी आतून पोषण देणेसुद्धा तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे आहारात बदल करून पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे.(फोटो सौजन्य – iStock)
उन्हाळ्यात केस कोरडे झाल्यानंतर केसांना पोषण देणे आवश्यक आहे. यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकल प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करावा. केसांच्या वाढीसाठी अळशीच्या बिया अतिशय प्रभावी ठरतात. त्यामुळे रोजच्या आहारात तुम्ही अळशीच्या बियांचे सेवन देखील करू शकता. आज आम्ही तुम्हाला अळशीच्या बियांचा वापर करून हेअर मास्क कसा तयार करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. अळशीच्या बियांचा वापर त्वचा आणि केसांसाठी केल्यास केस मऊ आणि सुंदर दिसतील.
केसांच्या वाढीसाठी केमिकल प्रॉडक्ट किंवा वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घेण्याऐवजी घरगुती उपाय करावे. घरगुती उपाय केल्यास केस मऊ आणि चमकदार दिसतील. अळशीच्या बियांचा वापर केल्यामुळे केस मऊ आणि स्मूथ होतात. हेअरमास्क तयार करण्यासाठी टोपात पाणी गरम करून त्यात अळशीच्या बिया आणि तांदळाचे पीठ टाकून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण वाफल्यानंतर गॅस बंद करून हेअरमास्क थंड करून घ्या.
तयार करून घेतलेले हेअर मास्क केसांवर लावण्यासाठी सर्वप्रथम केस व्यवस्थित विंचरून घ्या. त्यानंतर केसांच्या मुळांपासून ते टोकांपर्यंत सगळीकडे तयार केलेला हेअरमास्क लावून घ्या. 30 मिनिटं हेअरमास्क लावून नंतर शँम्पूच्या सहाय्याने केस स्वच्छ करून घ्या. यामुळे केसांची मूळ मजबूत होतील आणि केस सुंदर लागतील.
पायांचे घोटे काळेकुट झाले आहेत? मग ‘हे’ घरगुती उपाय करून पाय करा स्वच्छ, काळे झालेले पाय होतील सुंदर
अळशीच्या बियांचे सेवन केल्यास केसांसह त्वचेलासुद्धा अनेक फायदे होतात. याशिवाय यात फायबर, विटामिन बी कॉम्पलेक्स, प्रोटिन, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फोरस, थायामिन इत्यादी अनेक घटक आढळून येतात. यामध्ये असलेले नैसर्गिक घटक केसांना पोषण देतात. त्यामुळे अळशीच्या बियांचे नियमित सेवन करावे.