वाढत्या थंडीत सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा गरमागरम मिक्स व्हेज सूप!
राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे कडाक्याची थंडी पडली आहे. थंडगार वातावरणात सगळ्यांचं सर्दी, खोकला आणि साथीच्या आजारांचा सामना करावा. वारंवार सर्दी खोकला झाल्यानंतर घशात खवखव, सुका खोकला, नाकातून पाणी येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. याशिवाय थंडीच्या दिवसांमध्ये उष्ण आणि शरीरात ऊबदारपणा टिकून राहील अशा पदार्थांचे सेवन करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये गरमागरम मिक्स व्हेज सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. लहान मुलांसह मोठ्यांना भाज्या खायला अजिबात आवडत नाही. अशावेळी मुलांना वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करून बनवलेले पदार्थ खाण्यास द्यावेत. हिवाळ्यात बाजारामध्ये अनेक वेगवेगळ्या भाज्या उपलब्ध असतात. भाज्यांचे सेवन केल्यामुळे शरीराला विटामिन, मिनरल्स आणि फायबर इत्यादी अनेक आवश्यक घटक मिळतात. त्यामुळे शरीराला पोषण देण्यासाठी पालेभाज्या आणि इतर फळ भाज्यांचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया मिक्स व्हेज सूप बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)






