५ मिनिटांमध्ये तुळशीच्या पानांचा वापर करून बनवा 'हे' घरगुती फेसमास्क
हिंदू संस्कृतीमध्ये तुळशीच्या झाडाला विशेष महत्व आहे. प्रत्येक घराच्या अंगणात एक तरी तुळशीचे झाड असतेच. तुळशीचा वापर धार्मिक गोष्टींसाठी केला जातो. घरातील पूजेच्या वेळी तुळशीची पाने वापरली जाते. धार्मिक गोष्टींप्रमाणे आरोग्यासाठी सुद्धा तुळशीची पाने अतिशय प्रभावी आहेत. तुळशीच्या पानांचा वापर करून चहा, काढा किंवा इतरही अनेक पदार्थ बनवले जातात. आरोग्यासंबंधित समस्यांपासून तात्काळ आराम मिळवण्यासाठी तुळशीच्या पानांचा वापर करावा. तुळस औषधी वनस्पती म्हणून सुद्धा ओळखली जाते. यामध्ये अँण्टीऑक्सिडंट्स आणि अँण्टीइंफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात. बऱ्याचदा चेहऱ्यावर आलेले पिंपल्स किंवा मुरुमांचे डाग घालवण्यासाठी तुळशीच्या पानांचा वापर केला जातो.(फोटो सौजन्य – iStock)
केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी ‘हे’ हेअरमास्क ठरतील प्रभावी, केस होतील चमकदार
तुळशीची पाने त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी मदत करतात. यामध्ये असलेल्या अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांमुळे त्वचेवर आलेले पिंपल्स किंवा विषाणू पसरत नाही. तुळशीचे पान खाण्यासाठी जसे वापरले जाते तसेच ते ब्युटी प्रॉडक्ट बनवण्यासाठी सुद्धा वापरले जाते. तुळशीच्या पानांमध्ये अनेक गुणधर्म आढळून येतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तुळशीच्या पानांचा फेसमाक्स बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा फेसपॅक त्वचा कायम सुंदर आणि उजळदार करण्यासाठी मदत करतात.
फेसमास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम, तुळशीची पाने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर मिक्सरमधून बारीक वाटून पेस्ट तयार करा. तयार केलेल्या पेस्टमध्ये कोरफड जेल घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार केलेला फेसमास्क संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसाच ठेवा. यामुळे चेहऱ्यावर आलेले डाग, पिंपल्स आणि मुरूम निघून जाण्यास मदत होईल. त्यानंतर फेसमास्क पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
तुळशीची पाने मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. तयार केलेली पेस्ट वाटीमध्ये काढून त्यात चिमूटभर हळद आणि गुलाब पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून पेस्ट तयार करा. तयार केलेला फेसमास्क संपूर्ण चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचेसंबंधित समस्यांपासून लगेच आराम मिळेल. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स घालवण्यासाठी आणि त्वचा उजळदार करण्यासाठी तुळशीची पाने गुणकारी आहे. १० मिनिटं झाल्यानंतर फेसमास्क पाण्याने स्वच्छ धुवून टाका.
फेसमास्क तयार करण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात तुळशीची आणि कडुलिंबाची पाने घेऊन बारीक वाटून पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट चेहऱ्यावर लावून २० मिनिटांपेक्षा जास्त वेळ ठेवा आणि नंतर चेहरा पाण्याने धुवून टाका. यामुळे त्वचा कायम डागविरहित राहील आणि त्वचा उजळदार होण्यासाठी मदत होईल.