कंगव्यात येणारा केसांचा गुंता पाहून टक्कल पडण्याची भीती वाटते? मग खोबरेल तेलात मिक्स करा 'हे' बारीक दाणे, महिनाभरात दिसेल बदल
सकाळी उठल्यानंतर बऱ्याचदा केसांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंता होतो तर काहीवेळा केस अंथरुणावर पडलेले दिसतात. केस विचारल्यानंतर फनीमध्ये खूप जास्त केस येतात. केसांची मूळ कमकुवत झाल्यानंतर केसांच्या असंख्य समस्या उद्भवतात. त्यामुळे केसांची व्यवस्थित काळजी घेणे खूप जास्त गरजेचे आहे. धुळ, माती, प्रदूषण आणि वातावरणात सतत होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे केसांच्या समस्या वाढतात आणि केस तुटणे, केसांमध्ये कोंडा होणे, केस गळणे इत्यादी समस्या वाढून केसांमध्ये टक्कल पडेल की काय अशी भीती निर्माण होते. केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या हेअर केअर प्रॉडक्टचा वापर करतात. यासोबतच काहीवेळा केसांच्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. या ट्रीटमेंट केल्यानंतर काहीकाळ केस अतिशय सुंदर आणि चमकदार वाटतात, पण कालांतराने केस कमकुवत होऊन कोरडे पडतात.(फोटो सौजन्य – istock)
थंडीच्या दिवसांमध्ये केस खूप जास्त कोरडे होतात. वातावरणातील बदलांच्या परिणामामुळे केसांमध्ये कोंडा होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे थंडीत केसांची खूप जास्त काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला वारंवार उद्भवणाऱ्या केसांच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी खोबरेल तेल आणि मेथी दाण्यांचा वापर कशा पद्धतीने करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. वारंवार महागड्या हेअर ट्रीटमेंट करण्याऐवजी नैसर्गिक आणि घरगुती उपाय करून केसांची काळजी घ्यावी. खोबरेल तेल केस आतून मऊ आणि मुलायम करते. याशिवाय मेथी दाण्यांच्या वापरामुळे केसांना भरपूर पोषण मिळते.
केसांच्या आरोग्यासाठी खोबरेल तेल आणि मेथी दाणे अतिशय प्रभावी ठरतात. मेथी दाण्यांमध्ये असलेले घटक केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी करते. यामध्ये असलेले ‘निकोटिनिक ॲसिड’ आणि ‘प्रोटीन’ युक्त घटक हेअर फॉलिकल्सना पुन्हा जिवंत करण्याची ताकद देतात. याशिवाय शुद्ध खोबरेल तेलाचा वापर केसांसाठी केल्यास केसांच्या समस्या कधीच उद्भवणार नाही. यासाठी कढईमध्ये खोबरेल तेल गरम करून त्यात मेथी दाणे शिजवून घ्या. त्यानंतर तयार केलेले तेल थंड झाल्यानंतर गाळून घ्या.
तयार केलेले मेथी दाण्यांचे तेल केसांच्या वाढीवर सकारात्मक परिणाम करते. मेथी दाण्यांचे तेल केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत लावून घ्या. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. मसाज करून झाल्यानंतर केसांची सैल वेणी बांधून दुसऱ्या दिवशी शाम्पूच्या सहाय्याने केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय आठवड्यातून दोनदा केल्यास केसांच्या बऱ्याच समस्यांपासून आराम मिळेल आणि केस अतिशय मजबूत होण्यास मदत होते. मेथी दाण्यांमध्ये प्रोटीन, आयर्न आणि लेसिथिन भरपूर प्रमाणात आढळून येते. मेथी दाण्यांमध्ये अँटी-फंगल गुणधर्म केसांमध्ये वाढलेला कोंडा आणि इन्फेक्शन कमी करण्यासाठी मदत करते.






