लांबलचक केसांसाठी मेथी दाण्यांच्या पाण्यात मिक्स करा 'हे' पदार्थ
केसांच्या लांबलचक वाढीसाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी केसांच्या वेगवेगळ्या हेअर ट्रीटमेंट केल्या जातात तर कधी सुंदर आणि चमकदार दिसण्यासाठी महागडे शॅम्पू लावून केसांची काळजी घेतली जाते. मात्र केसांच्या वाढीसाठी केसांना आतून पोषण देणे आवश्यक आहे. निरोगी आरोग्यासाठी आहारात सतत काहींना काही बदल केला जातो. मात्र चुकीच्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे आरोग्यासह केसांचे सुद्धा नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. पावसाळ्यात केसांमध्ये वाढलेला कोंडा, केस अचानक तुटणे, केस सतत गळणे किंवा केसांसंबधित अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर महिला डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करतात.(फोटो सौजन्य – istock)
कडुलिंब आणि वाटीभर तुपाचा वापर करून १० मिनिटांमध्ये घरीच तयार करा औषधी काजळ, डोळ्यांना मिळेल थंडावा
दैनंदिन आहारात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यासोबतच केसांवर सुद्धा दिसून येतो. प्रदूषण, धूळ, माती इत्यादी अनेक कारणामुळे केस अतिशय निस्तेज आणि नाजूक होऊन जातात. त्यामुळे केसांच्या निरोगी आणि चमकदार वाढीसाठी कोणत्याही चुकीच्या प्रॉडक्टचा वापर न करता घरगुती उपाय करून केसांची काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला केसांच्या निरोगी वाढीसाठी मेथी दाण्यांच्या पाण्यात कोणते पदार्थ मिक्स करून लावावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.fenu
मेथीचे दाणे केसांसाठी अतिशय प्रभावी आहे. यामध्ये असलेले गुणधर्म त्वचा, केस आणि आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात. मेथीच्या दाण्यांमध्ये प्रथिने, विटामिन सी इत्यादी अनेक घटक आढळून येतात. यामुळे केसांना पोषण मिळते. केसांची कमकुवत झालेली मूळ मजबूत आणि स्ट्रॉंग करण्यासाठी मेथी दाण्यांच्या स्प्रेचा वापर करावा. मेथी दाण्यांची पेस्ट केसांवर लावल्यामुळे कोंडा कमी होतो. चला तर जाणून घ्या केसांच्या वाढीसाठी हेअर ग्रोथ स्प्रे बनवण्याची कृती.
मेथी दाण्यांचा स्प्रे तयार करण्यासाठी, बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात अर्धा चमचा मेथी दाणे टाकून भिजत ठेवा. रात्रभर मेथी दाणे व्यवस्थित भिजल्यानंतर टोपात मेथी दाण्यांचे तयार केलेले पाणी, कढीपत्त्याची पाने आणि रोजमेरी टाकून उकळवून घ्या. तयार केलेले पाणी गाळून थंड करा. त्यानंतर स्प्रे बॉटलमध्ये भरून केसांच्या मुळांवर नियमित वापर करा. यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होईल. दिवसभरातून एकदा हा स्प्रे केसांच्या मुळांवर मारल्यास केस अतिशय सुंदर आणि लांबलचक होण्यास मदत होईल.