कडुलिंब आणि वाटीभर तुपाचा वापर करून १० मिनिटांमध्ये घरीच तयार करा औषधी काजळ
सर्वच महिला डोळे सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी डोळ्यांना काजळ, आयलायनर किंवा मस्कारा लावतात. यामुळे डोळ्यांच्या सौंदर्यात वाढ होते. डोळ्यांच्या कडांवर काळ्या गडद रंगाचे काजळ लावल्यामुळे डोळे अतिशय सुंदर आणि उठावदार दिसू लागतात. काही महिला मेकअप केल्यानंतर दररोज न विसरता काजळ लावून कामानिमित्त बाहेर जातात. पण बऱ्याचदा बाजारातील हानिकारक केमिकलयुक्त रासायनिक काजळामुळे डोळ्यांचे सौंदर्य खराब होण्याची शक्यता असते. डोळ्यांचे इन्फेशन, डोळ्यांमधून सतत पाणी येणे किंवा डोळे लाल होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे डोळ्यांच्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. डोळ्यांसाठी कोणत्याही चुकीच्या प्रॉडक्टचा वापर करू नये. बाजारात अनेक वेगवेगळ्या ब्रँडचे काजळ उपलब्ध आहेत. पण यामध्ये असलेल्या रसायनामुळे डोळे अतिशय खराब होऊन जातात.(फोटो सौजन्य – pinterest)
काहींना नियमित काजळ लावण्याची सवय असते. अशावेळी बाजारात उपलब्ध असलेले हानिकारक केमिकलयुक्त काजळ लावण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करून काजळ तयार करावे. आज आम्ही तुम्हाला कडुलिंब आणि तुपाचा वापर करून १० मिनिटांमध्ये काजळ तयार करण्याची कृती सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले काजळ दीर्घकाळ डोळ्यांवर टिकून राहील. याशिवाय डोळे सुंदर आणि उठावदार दिसतील. कडुलिंबाच्या पानांत असलेले अँटीसेप्टिक, अँटीबॅक्टेरियल गुणधर्म डोळ्यांना थंडावा देतात. चला तर जाणून घेऊया काजळ बनवण्याची सोपी कृती.
खरंच तेल मालिश शरीरावरील स्ट्रेच मार्क्सची करेल सुट्टी? ‘हा’ आहे रामबाण उपाय