फोटो सौजन्य - Social Media
आपल्या स्वयंपाकघरात काही अशा नैसर्गिक गोष्टी असतात ज्या केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर त्वचेसाठीही खूप फायदेशीर ठरू शकतात. त्यापैकी दही आणि हळद या दोन घटकांचा उपयोग त्वचेच्या अनेक समस्यांवर उपचार करण्यासाठी केला जाऊ शकतो. या दोन्ही नैसर्गिक घटकांमध्ये असे पोषक गुणधर्म असतात, जे त्वचेला निरोगी आणि तेजस्वी ठेवण्यास मदत करतात.
फेसपॅक कसा तयार करावा?
सर्वप्रथम एका छोट्या वाटीत अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे दही घ्या. हे दोन्ही घटक एकत्र करून एकसंध आणि मऊ पेस्ट तयार करा. या घरगुती फेसपॅकचा वापर स्किन केअर रूटीनमध्ये कसा करावा हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
वापरण्याची योग्य पद्धत
तयार केलेला फेसपॅक संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर समान प्रमाणात लावा. अधिक चांगले परिणाम मिळवण्यासाठी हे मिश्रण १५ ते २० मिनिटे त्वचेवर ठेवावे. यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. चेहरा धुतल्यानंतर त्वचेवर होणारा सकारात्मक बदल तुम्हाला लगेच जाणवेल.
त्वचेसाठी लाभदायक
जर तुम्हाला पिंपल्सचा त्रास होत असेल तर हा फेसपॅक आठवड्यातून एक ते दोन वेळा वापरणे उपयुक्त ठरते. तसेच त्वचेची रंगत सुधारण्यासाठी आणि स्किन इन्फेक्शनचा धोका कमी करण्यासाठी हळद-दही फेसपॅक उपयोगी ठरतो. मात्र, हा फेसपॅक चेहऱ्यावर लावण्यापूर्वी त्वचेवर छोटा ‘पॅच टेस्ट’ करून घ्यावी, जेणेकरून कोणतीही अॅलर्जी होणार नाही याची खात्री करता येईल. हळद आणि दही यांचा फेसपॅक हा एक नैसर्गिक आणि रसायनमुक्त उपाय आहे, जो त्वचेला नैसर्गिक पद्धतीने उजळवण्यास मदत करतो.