पोट स्वच्छ होण्यासाठी ताकात मिक्स करा हे पदार्थ
बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर दिसू लागल्यानंतर अनेक शारीरिक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये सतत होणारे बदल, चुकीची जीवनशैली, सतत तेलकट किंवा तिखट पदार्थ इत्यादी गोष्टींमुळे आरोग्य बिघडून जाते. पचनक्रिया बिघडल्यानंतर पोटातील विषारी पदार्थ पोटात तसेच साचून राहतात, ज्यामुळे शरीरात उष्णता वाढू त्वचेवर पिंपल्स येणे, तोंड येणे, लठ्ठपणा वाढणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. पोट दुखी किंवा पोटात गॅस झाल्यानंतर काम करण्याची इच्छा कमी होऊन शरीर अस्वथ होऊन जाते. पोटात गॅस किंवा पचनक्रिया बिघडल्यानंतर अनेक लोक डॉक्टरांच्या गोळ्या औषध आणून खातात, मात्र यामुळे तात्पुरता फरक पडतो आणि पुन्हा पचनक्रिया बिघडून जाते. त्यामुळे डॉक्टरांच्या गोळ्या औषध खाण्यापेक्षा घरगुती उपाय करावे.
पोट दुखी किंवा पोटासंबंधित कोणत्याही समस्या उद्भवल्यानंतर अनेकदा ओवा किंवा जिऱ्याचे पाणी बनवून पिण्यास दिले जाते. पोटाच्या आरोग्यासाठी ताक, जिरं, ओवा हे पदार्थ अतिशय गुणकारी मानले जाते. या पदार्थांचे सेवन केल्यामुळे पोटातील घाण स्वच्छ होते आणि आराम मिळतो. ताक, ओवा आणि जिरं खाल्यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पोटासंबंधित समस्या उद्भवल्यानंतर ताकात कोणते पदार्थ मिक्स करून प्यावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: या हिरव्या भाजीपासून बनवा नॅचरल कंडिशनर, काही मिनिटांतच केस होतील स्मूद आणि चमकदार
गॅस किंवा अपचनाची समस्या उद्भवल्यानंतर एक ग्लास ताकात बारीक केलेली ओव्याची पावडर मिक्स करून प्यावे. ज्यामुळे पोटातील गॅस आणि विषारी पदार्थ बाहेर पडून जाण्यास मदत होईल. या मिश्रणाचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. तसेच यामुळे पोटातील विषारी गॅस बाहेर पडून जातात आणि पोट हलके होते.
बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी जिऱ्याच्या पाण्याचे सेवन केले जाते. जिऱ्याचे पाणी पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. रिकाम्या पोटी नियमित जिऱ्याचे पाणी प्यायल्यास पोटातील जळजळ कमी कमी होऊन आराम मिळतो. तसेच तुम्ही ताकात सुद्धा जिऱ्याची पावडर मिक्स करून पिऊ शकता. यामुळे पोटासंबंधित समस्यांपासून आराम मिळेल.
हे देखील वाचा: नेहमीच आनंदी राहण्यासाठी आजच बदला या सवयी
उन्हाळ्याच्या दिवसांमध्येच ताक प्यावे, असे अनेकांना वाटते. पण तुम्ही सर्वच ऋतूंमध्ये ताकाचे सेवन करू शकता. ताक प्यायल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन आरोग्य सुधारण्यास मदत होते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पोटातील जळजळ कमी करण्यासाठी आहारात ताकाचे सेवन करावे. यामुळे पचनक्रिया सुधारते.