त्वचा कायमच उजळदार आणि फ्रेश ठेवण्यासाठी तांदळाच्या पाण्यात मिक्स करा 'हा' पदार्थ
बाजारात अनेक वेगवेगळे स्किन केअर प्रॉडक्ट उपलब्ध आहेत. पण तांदळाचे पाणी त्वचा सुधारण्यास मदत करते. कोरियन स्किन केअर प्रॉडक्ट तयार करण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा वापर केला जातो. यामुळे त्वचा सतेज, मुलायम आणि टवटवीत दिसू लागते. चेहऱ्यावरील हरवलेला ग्लो पुन्हा परत मिळवण्यासाठी तांदळाच्या पाण्यात मध मिक्स करून लावावे. यामुळे चेहऱ्यावर वाढलेले डाग आणि पिंपल्स कमी होण्यास मदत होते. तांदळाचे पाणी आणि मध त्वचेसाठी अतिशय उत्तम आहे. चला तर जाणून घेऊया तांदळाचे पाणी आणि मध कसे वापरावे.
तांदळाचे पाणी त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते. त्वचेवर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी तांदूळ आणि मध वापरावे. याशिवाय नॅचरल फेसपॅक म्हणून तुम्ही तांदळाचे पाणी वापरू शकता. यासाठी वाटीमध्ये तयार केलेले तांदळाचे पाणी घेऊन त्यात मध मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसेच ठेवा. यामुळे टॅनिंग कमी होईल आणि त्वचा सुंदर दिसेल. सकाळी झोपेतून उठल्यानंतर तांदळाच्या पाण्याचे मिश्रण त्वचेवर लावल्यास त्वचा हायड्रेट राहील. तांदळाचे पाणी त्वचेवर लावून हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर ३० मिनिटं ठेवून नंतर पाण्याने त्वचा स्वच्छ धुवून टाका.






