मुंबईचा वडापाव खाद्यसंस्कृतीत जगात भारी!
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं वडापाव खायला आवडतो. संध्याकाळच्या वेळी लागलेली हलकी भूक भागवण्यासाठी वडापाव खाल्ला जातो. बटाट्याची भाजी आणि पावचे कॉम्बिनेशन करून तयार करण्यात आलेला वडापाव केवळ भारतातच नाहीतर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत. मुंबईच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक गल्लीमध्ये तुम्हाला एक तरी वडापावची गाडी पाहायला नक्कीच मिळेल. जगातील सर्वोत्तम पदार्थांच्या यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर वडापावचे नाव आहे. अतिशय सामान्य पदार्थाची चव चाखण्यासाठी देश विदेशातून भारतात येतात. झणझणीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर वडापाव, मिसळ वडा इत्यादी पदार्थ आवडीने खाल्ले जातात. (फोटो सौजन्य – istock)
भारताची खाद्यसंस्कृती वैविध्यपूर्ण आणि व्यापक आहे. देशाच्या प्रत्येक राज्यातील, जिल्ह्यातील, शहरातील नाक्या-नाक्यावर मिळणाऱ्या प्रत्येक पदाथांची चव हटके असते. याच चवीची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे. जगातील १०० यादीत टेस्ट अॅटलस २०२५-२६ मध्ये मुंबईने पाचवे स्थान मिळवले आहे. जागतिक टॉप टेनमध्ये हे एकमेव भारतीय शहर आहे. मुंबईसह देशातील इतर पाच शहरांनीही यात स्थान मिळवले आहे. टेस्टअॅटलसने जगातील १०० सर्वोत्तम खाद्य शहरांची २०२५-२६ यादी जाहीर केली आहे. टेस्ट अँटलसच्या या अहवालाने स्थानिक भारतीय खाद्यपदार्थांना आता वेगळीच ओळख मिळवून दिली आहे. पहिल्या दहा शहरांमध्ये मुंबईने मिळवलेले स्थान हे प्रत्येक भारतीयासाठी गौरवास्पद आहे. भारताच्या प्राचीन ककनीचे पाय मिळवली आहे. त्यामुळे देशाची निर्विवाद स्ट्रीट फूट राजधानी म्हणून मुंबईचे स्थान पुन्हा अधोरेखित झाले आहे.
टेस्ट अॅटलासच्या मते, अव्वल चार स्थानांवर इटालियन शहरांनी बाजी मारली आहे. नेपल्सने पहिला क्रमांक पटकावला, त्यानंतर मिलान, बोलोन्या आणि फ्लोरेन्स यांचा क्रमांक लागतो, ज्यामुळे जागतिक अन्न संस्कृतीत इटलीचे वर्चस्व अधोरेखित होते. राम आश्रय, श्री ठाकर भोजनालय, कॅफे मद्रास, नवाब साहेब आणि बाबा फालूदा इत्यादी प्रसिद्ध ठिकाण आहेत.
टेस्ट अॅटलस एक आंतरराष्ट्रीय ऑनलाइन खाद्य माहितीकोश आहे. जे जगभरातील पारंपरिक आणि प्रादेशिक अन्नपदार्थ, स्थानिक रेसिपीज आणि खाद्यसंस्कृती याचा अभ्यास करून त्याची यादी तयार करते.






