नवरात्रीसाठी खास लुक (फोटो सौजन्य - Instagram)
अंबानी कुटुंब प्रत्येक सण एका खास पद्धतीने साजरा करते. सध्या, मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरी अँटिलिया येथे नवरात्रीचा उत्साह दिसून येत आहे. प्रत्येक सणादरम्यान नीता अंबानी त्यांच्या लुकमुळे अनेकदा चर्चेत असतात, तर नवरात्रीत रंगीबेरंगी आणि शाही भारतीय पोशाखाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
नीता अंबानींचा क्लासी लेहंगा
नीता अंबानीच्या लेहंग्याचा क्लासी लुक
नीता अंबानींचा लुक हा कायम आकर्षक आणि क्लासी दिसून येतो. नीता अंबानीं यांनी नवरात्रीसाठी खास नऊ रंगांचा लेहेंगा घातला होता आणि त्यांचा हा लुक व्हायरल झालाय. फोटोग्राफर मानव मंगलानीने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर नीता अंबानीच्या तिच्या आकर्षक पोशाखातील अनेक फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये, नीता अंबानी रंगीबेरंगी लेहेंग्यात सुंदर दिसत आहे. तिने मोनिका आणि करिश्माने डिझाइन केलेला जेड लेहेंगा आणि चोली घातली होती. उल्लेखनीय म्हणजे, हा लेहेंगा देवीच्या नऊ अवतारांचे उत्सव साजरा करतो, ज्याला नवरंग म्हणून पाहिले जाते. त्यात समृद्ध बनारसी ब्रोकेडमध्ये नऊ रंग विणलेले आहेत.
नवरंगी ब्लाऊज
रॉयल एम्ब्रॉयडेड ब्लाऊज
नीता अंबानीने तिचा रंगीबेरंगी लेहेंगा गुलाबी ब्लाउजसह जोडला. ब्लाउजमध्ये सोनेरी आणि कांस्य डिझाइन होते. बाही आणि नेकलाइनवरील एम्ब्रॉयडेड भरतकाम त्यांच्या लुकमध्ये अधिक भर घालत आहे. त्यांचा लेहेंगा पारंपारिक टाय-डाय तंत्राचा वापर करून रंगवलेल्या लेहेरिया दुपट्ट्यासोबत जोडला.
हिरा पन्ना दागिन्यांचा साज
हिरा आणि पाचूचे रॉयल दागिने
नीता अंबानी यांनी नऊ रंगांचा मिक्स असणारा लेहेंगा घातला असून त्यासह त्यांनी हिरेजडित आणि सुंदर तीन-स्तरीय हिरापन्ना रंगाचे हार आणि कानातले घातले आहेत.याशिवाय हातात रंगबेरंगी बांगड्या आणि बोटात अनेक अंगठ्या घालून लुक पूर्ण केलाय. परफेक्ट नवरात्रीचा हा लुक कमालीचा आकर्षक दिसतोय.
हेअरस्टाईल आणि ग्लॉसी मेकअप
पाहताच राहावा असा मेकअप
नीता अंबानीच्या मेकअपबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी कपाळावर लाल बिंदी लावली आहे आणि पारंपरिक लुक पूर्ण केलाय. तर मध्य-भागी भांग पाडून सुंदरसा आंबाडा घातला आहे आणि त्यात गजरा माळून भारतीय लुकमध्ये अधिक भर घातली आहे. याशिवाय बेस फाऊंडेशन, गुलाबी हायलायटर, आयशॅडो, काजळ, मस्कारा, आयलायनर आणि गुलाबी ग्लॉसी लिपस्टिक लावत त्यांनी हा मेकअप लुक पूर्ण केलाय.
नवरात्रीच्या नऊ रंगांना समर्पित रंगीत लेहेंग्यात तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि चाहत्यांना ते खूप आवडले आहे. तुम्हीही दांडिया किंवा गरबा रात्रीसाठी हा लूक पुन्हा तयार करू शकता.