दिवाळीत गॅसचा वापर न करता सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा हलवाईसारखी रुचकर मिठाई
दिवाळीच्या दिवसांमध्ये घरात फराळातील पदार्थ, मिठाई इत्यादी अनेक गोष्टी बनवल्या जातात. पण बऱ्याचदा कामाच्या धावपळीमुळे काहींना दिवाळीचा फराळ बनवण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. दिवाळीच्या फराळातील पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ लागतो. योग्य प्रमाण, भाजणी इत्यादी गोष्टी व्यवस्थितन न झाल्यास पदार्थ पूर्णपणे खराब होऊन जाते. फराळातील पदार्थ विकत आणले जातात. पण मिठाई विकत आणण्यापूर्वी मनात अनेक शंका निर्माण होतात. कारण सणावाराच्या दिवसांमध्ये बाजारातील मिठाईच्या पदार्थांमध्ये मोठी भेसळ केली जाते. भेसळ युक्त पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला गॅसचा वापर न करता हलवाईसारखी रुचकर मिठाई बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ घरातील लहान मुलांसह मोठ्यांना खूप जास्त आवडेल. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
दिवाळी सणाला कोकणातील प्रत्येक घरात बनवली जातात तांदळाच्या पिठाची बोर, नोट करून घ्या पारंपरिक रेसिपी
चहाची मजा होईल द्विगुणित, घरी बनवा कुरकुरीत आणि झटपट तयार होणारी ‘मसाला पापडी’