जेवणातील पदार्थांची चव वाढवणारा कांदा केसांसाठी ठरेल गुणकारी!
जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना कांद्याचा वापर केला जातो. कांद्याच्या फोडणीशिवाय जेवणाला चवच येत नाही. याशिवाय तिखट चवीचा कांदा आरोग्यासाठी सुद्धा अतिशय गुणकारी आहे. त्यामुळे रोजच्या आहारात तुम्ही नियमित कांद्याचे सेवन करू शकता. बऱ्याचदा धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम जसा आरोग्यावर दिसून येतो, तसाच परिणाम केस आणि त्वचेवर सुद्धा लगेच दिसून येतो. बऱ्याचदा केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर महिला दुर्लक्ष करतात. पण वारंवार दुर्लक्ष करणे केसांच्या आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकते. त्यामुळे केसांसंबधित समस्या उद्भवू लागल्यानंतर योग्य ते उपचार करणे आवश्यक आहे. सतत होणारी केस गळती, केसांमध्ये वाढलेले टक्कल, केसांमध्ये कोंडा होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर दुर्लक्ष न करता वेळीच उपाय करणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – pintrest)
केसांसंबधित समस्या वाढू लागल्यानंतर महिला बाजारातील महागड्या शँम्पू किंवा हेअर केअर प्रॉडक्टचा वापर करतात. मात्र कोणतेही चुकीचे प्रॉडक्ट वापरण्याऐवजी घरगुती उपाय करून केसांच्या आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. म्हणूनच आज आज आम्ही तुम्हाला केसांच्या वाढत्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी हेअर एक्स्पर्ट जावेद हबीब यांनी सांगितलेल्या काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्स फॉलो करून तुम्ही केसांची योग्य काळजी घेऊ शकता.
केसांच्या वाढीसाठी कांद्याचा रस अतिशय प्रभावी ठरतो. कांद्याच्या रसात असलेल्या गुणधर्मांमुळे टाळूवर वाढलेले इन्फेक्शन कमी करण्यास मदत करतो. कांद्यामध्ये नैसर्गिक सल्फर आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे केसांची मूळ मजबूत आणि कायमच हेल्दी राहण्यास मदत होते. केसांच्या वेगवेगळ्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कांद्याच्या रसाचा वापर करावा. केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय अतिशय प्रभावी आणि गुणकारी ठरतात. इतर कोणतेही केमिकल प्रॉडक्ट वापरण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करून केसांची काळजी घ्यावी.
महिनाभरात होईल केसांची घनदाट वाढ! ‘हे’ घरगुती उपाय केल्यास केस गळणे होईल कायमचे कमी
केसगळती, टक्कल पडणे, स्काल्पचा कोरडेपणा, अकाली केस पांढरे होणे इत्यादी सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कांद्याचा रस अतिशय गुणकारी ठरतो. ताज्या कांद्याचा रस काढून त्यात खोबऱ्याचे तेल मिक्स करून केसांवर लावावे. त्यानंतर केस हलक्या हाताने मसाज करून घ्या. केसांच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कांद्याच्या रसाचा वापर करावा. कांद्याचा रस आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केसांच्या मुळांपासून अगदी टोकापर्यंत सगळीकडे लावून घ्यावा.