चुकीचे डाएट केल्यामुळे आरोग्यावर होणार दुष्परिणाम
वाढलेले वजन कमी करण्यासाठी महिलांसह मुलीदेखील आहार तज्ज्ञांकडून किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून डाएट प्लॅन घेतात. मात्र चुकीच्या पद्धतीने डाएट प्लॅन फॉलो केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. केरळमधील कन्नूर चुकीचा डाएट प्लॅन फॉलो केल्यामुळे 18 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी तिने ऑनलाईन डाएट प्लॅन घेतला होता. याशिवाय वजन वाढेल या भीतीने तिने जेवणे देखील बंद केले होते. मात्र याच डाएटचा तिच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला. वजन कमी करण्यासाठी ती नेहमी जास्तीचा व्यायाम आणि द्रव अन्नपदार्थचे सेवन करत होती. या सगळ्याचा तिच्या शरीरावर गंभीर परिणाम झाला.
शरीरावर वाढलेली अतिरिक्त चरबी किंवा वाढलेले वजन कमी करताना अनेक लोक डाएट फॉलो करतात. मात्र चुकीचे डाएट फॉलो केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. वजन कमी करण्यासाठी बऱ्याचदा सकाळचे आणि रात्रीचे जेवण करणे टाळले जाते. मात्र असे केल्यामुळे शरीरातील ऊर्जेची पातळी पूर्णपणे खालावते आणि आरोग्यासंबंधित गंभीर आजार उद्भवू लागतात. सकाळच्या वेळी उपाशी पोटी घरातून बाहेर गेल्यानंतर कॅन्सर किंवा टीबी सारखे गंभीर आजारांची लगेच लागण होते, ज्यामुळे संपूर्ण आरोग्यच बिघडून जाते.
निरोगी आरोग्य जगण्यासाठी शरीराला सर्व घटकांची आवश्यकता असते. आंबट, गोड, तिखट, कडू, तुरट इत्यादी सर्वच पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. मात्र अनेक लोक वजन कमी करण्याच्या नांदात पौष्टिक पदार्थ खाण्याऐवजी अतिशय कमी कॅलरीज असलेल्या पदार्थांचे सेवन करतात. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला जास्त ऊर्जा मिळत नाही. शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यानंतर हृदयाचे कार्य बिघडू लागते. गरजेपेक्षा जास्त डाएट फॉलो केल्यामुळे शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. शरीरात थकवा, अशक्तपणा, कमजोरी जाणवू लागते. त्यामुळे वजन कमी करताना शरीराला ऊर्जा देण्याऱ्या पदार्थांचे सेवन करावे.
वजन कमी करताना पौष्टिक आणि शरीराला पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. शरीरातील ऊर्जा कमी होईल अशा पदार्थांचे सेवन न करता शरीरातील ऊर्जा वाढेल अशाच पदार्थांचे सेवन करावे. शरीराची बांधणी योग्य ठेवणे आवश्यक आहे. शरीरावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी आहारात फळे, भाज्या, कडधान्य, पालेभाज्या, ओट्स इत्यादी पौष्टिक आणि शरीराला ऊर्जा देणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे.