कपिल शर्माने केले 63 दिवसात 11 किलो वजन कमी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
कॉमेडी किंग कपिल शर्मा सध्या केवळ त्याच्या विनोदांमुळेच नाही तर त्याच्या फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनमुळेही चर्चेत आहे. नेटफ्लिक्सच्या द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये जेव्हा कपिलचा नवीन आणि बदललेला लूक समोर आला तेव्हा चाहते तसेच फिटनेस तज्ज्ञही आश्चर्यचकित झाले आहेत. आता प्रश्न असा निर्माण होतो की कपिलने हा बदल कसा केला? वजन कसे कमी केले तर याचे उत्तर आहे फिटनेस कोच योगेश भटेजा आणि त्याचा अतिशय सोपा पण प्रभावी फिटनेस फॉर्म्युला ज्याला तो २१-२१-२१ नियम म्हणतो. जो भटेजाने एका यूट्यूब चॅनेलसोबत शेअर केला आहे. नक्की काय आहे हा फॉर्म्युला आपण जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStock/Instagram)
वेट लॉस फॉर्म्युला
कपिल शर्माने फक्त ६३ दिवसांत ११ किलो वजन कमी केले. त्याने कोणतेही अतिरेकी असे डाएट फॉलो केले नाही की आहार घेतला नाही किंवा जिममध्ये तासनतास घाम गाळला नाही. त्याने जे केले ते म्हणजे एक संथ पण अत्यंत टिकाऊ अशी प्रक्रिया स्वीकारली, ज्यामध्ये शरीर आणि मन दोन्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने बदलण्यात आले.
कपिलचे प्रशिक्षक योगेश भटेजा यांनी सांगितले की, बहुतेक लोक फिटनेसच्या सुरुवातीलाच हार मानतात कारण त्यांच्यासाठी या सगळ्या गोष्टी अचानक खूप जास्त होतात, मग ते कसरत असो किंवा डाएटिंग असो. यामुळेच त्यांचे शरीर आणि मन दोन्ही लवकर थकतात आणि ते दिनचर्येतून बाहेर पडतात. म्हणून त्याने कपिलसाठी एक सूत्र स्वीकारले, ज्यामध्ये दर २१ दिवसांनी एक बदल होतो आणि शरीर अधिक फिट होते
काय सांगता? केवळ पाणी पिऊन होऊ शकते 10 किलो वजन कमी, 15 दिवसात दिसेल परिणाम
काय आहे 21-21-21 रूल?
या नियमात एकूण ६३ दिवस आहेत, जे तीन भागात विभागले आहेत. प्रत्येक टप्पा २१ दिवसांचा आहे. ते कशा पद्धतीने ते आपण जाणून घेऊ
पहिले २१ दिवस – हालचालींवर लक्ष केंद्रित कराः हा टप्पा शरीराला सक्रिय करण्यापासून सुरू होतो. जिममध्ये जाण्याची गरज नाही. कोच योगेश म्हणतात, “या २१ दिवसात, तुम्हाला फक्त शरीराची हालचाल करावी लागते – स्ट्रेचिंग, पीटी क्लाससारखे सोपे व्यायाम आहेत. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही जिलेबी खाऊ शकता, परंतु दररोज शरीराची हालचाल करा. यामुळे तुमचे स्नायू सक्रिय होतात आणि शरीर कसरत करण्यासाठी तयार होते.” या टप्प्याचा उद्देश फक्त शरीराला चालण्याची सवय लावणे आहे, वजन कमी करणे नाही.
पुढचे २१ दिवस – आहारात थोडा बदलः यानंतर खाण्यापिण्यावर लक्ष केंद्रित करण्याची वेळ येते. पण येथेही कोणतेही कठोर नियम नाहीत. भटेजा म्हणतात, “आम्ही कपिलच्या आहारात कोणतेही टोकाचे बदल केले नाहीत. आम्ही कॅलरी मोजल्या नाहीत किंवा कार्बोहायड्रेट्स कमी केले नाहीत. आम्ही फक्त तो काय खात होता आणि कधी खात होता ते पाहिले आणि थोडे संतुलन निर्माण केले.” हा टप्पा लोकांना अन्नाची भीती बाळगण्याऐवजी समजून घेण्याचा सल्ला देतो.
शेवटचा टप्पा २१ दिवस – सवयींवर नियंत्रणः शेवटचे २१ दिवस मानसिक आणि भावनिक तंदुरुस्तीसाठी आहेत. यामध्ये, व्यक्ती त्याच्या वाईट सवयी ओळखते आणि त्यापासून अंतर राखण्यास सुरुवात करते जसे की सिगारेट, अल्कोहोल किंवा जास्त कॅफिन. प्रशिक्षक म्हणतात की जेव्हा तुम्ही ४२ व्या दिवशी पोहोचता तेव्हा तुम्हाला स्वतःमध्ये बदल जाणवतो. नंतर तुम्हाला बरे व्हावेसे वाटते. ही अशी वेळ आहे जेव्हा तुम्ही वाईट सवयी सोडण्याचा सर्वात दृढ निर्णय घेऊ शकता.
थुलथुलीत पोट आणि लटकलेली चरबी कमी करून करा वेट लॉस, जपानी ट्रिक्स वापरून बघा जादू!
ही पद्धत प्रभावी का आहे?
भटेजा मानतात की ही पद्धत विशेषतः नवशिक्यांसाठी प्रभावी आहे. यामध्ये, अचानक तंदुरुस्तीचा ताण येत नाही. किंवा मनावर ओझे येत नाही. त्यांचा असा विश्वास आहे की ६३ दिवसांनंतर, तंदुरुस्ती मिळवणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही प्रेरणेची आवश्यकता नसते. त्याच्या शरीरात होणारे बदल पाहून तो प्रेरित होतो.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.