रहेजा हॉस्पिटलकडून ब्रह्मकुमारी संस्थेसाठी महिला दिनानिमित्त आरोग्यसंबंधित चर्चा, मेडिटेशन सत्राचे आयोजन
८ मार्चला जगभरात सगळीकडे जागतिक महिला दिन साजरा केला जातो. महिलांच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी आणि त्यांचा समाजात आदर, सन्मान वाढवण्यासाठी सगळीकडे महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महिला दिनानिमित्त अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कामाचा वाढलेला तणाव, सतत घरातील कामे, अपूरी झोप, हार्मोनचे असंतुलन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसुन येतो. यामुळे महिलांचे मानसिक संतुलन बिघाडून जाते. मसिक पाळीच्या दिवसांमध्ये महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मासिक पाळीमध्ये होणारे मूड स्विंग आणि प्रजनन समस्या, वाढलेले वजन, अनियमित मासिक पाळी इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे रोजच्या धावपळीमधून थोडा वेळ महिलांनी स्वतःच्या आरोग्यासाठी देणे आवश्यक आहे.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एस.एल. रहेजा हॉस्पिटल, माहीम – फोर्टिस सहयोगी हॉस्पिटलने ब्रह्मकुमारी संस्थेसाठी आरोग्यसंबंधित चर्चेचे आयोजन केले. या उपक्रमाचा महिलांच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या परिस्थितींबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा आणि त्यांना जीवनाच्या सर्व टप्प्यांवर दर्जेदार आरोग्यसेवा मिळवण्यास प्रेरित करण्याचा मनुसबा होता. माहिम येथील एस.एल. रहेजा हॉस्पिटलमधील कन्सल्टण्ट-ग्यानेकोलॉजिकल सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. वृंदा करंजगावकर यांनी 60 हून अधिक उपस्थितांसाठी सत्राचे आयोजन केले. जागरूकता मोहिमेत महिलांच्या आरोग्यासंदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली, जसे स्त्रीरोगविषयक समस्या, स्तनाचा कर्करोग, इत्यादी. त्यानंतर, उपस्थितांसाठी मेडिटेशन सत्राचे आयोजन करण्यात आले.
ब्रह्मकुमारी संस्थेच्या दादर व माहिम शाखेच्या प्रमुख दीदी उईवाला यांनी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थिती दाखवून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. माहितीपूर्ण चर्चा आणि मार्गदर्शनपर चिंतनाच्या माध्यमातून या इव्हेण्टमध्ये महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी लवकर निदान, प्रतिबंधात्मक काळजी आणि मानसिक आरोग्याचे महत्त्व निदर्शनास आणण्यात आले.
या उपक्रमाबाबत मत व्यक्त करत एस. एल. रहेजा हॉस्पिटल माहिम – फोर्टिस सहयोगी हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल पुनामिया म्हणाले, ”महिलांमधील आरोग्यसेवेला योग्य महत्त्व दिले पाहिजे, कारण प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा सर्व वयोगटातील महिलांचे आरोग्य व स्वास्थ्य उत्तम ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. एस.एल. रहेजा हॉस्पिटलमध्ये आम्ही महिलांना प्रभावित करणाऱ्या गंभीर आरोग्य समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी कटिद्ध आहोत. हे सत्र महिलांना त्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेण्यासाठी शिक्षित आणि सक्षम करण्याच्या दिशेने पाऊल आहे.”