रामदेव बाबांनी सांगितले किडनी स्वच्छ करण्याचे सोपे उपाय
मूत्रपिंड अर्थात किडनी हा शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. हा बीनच्या आकाराचा अवयव जो मणक्याच्या दोन्ही बाजूला, फास्यांच्या खाली असतो. किडनीचे काम रक्तातील कचरा, अतिरिक्त द्रव आणि विषारी पदार्थ फिल्टर करणे आहे. मूत्रपिंड रक्तदाब नियंत्रित करण्यास, इलेक्ट्रोलाइट्स जसे की सोडियम, पोटॅशियम आणि कॅल्शियमचे संतुलन राखण्यास आणि एरिथ्रोपोएटिन नावाचे संप्रेरक सोडून लाल रक्तपेशींना समर्थन देण्यास मदत करतात.
एकूणच, शरीरातील द्रव संतुलन राखण्यासाठी आणि हानिकारक पदार्थ काढून टाकण्यासाठी किडनी निरोगी आणि मजबूत असणे खूप महत्वाचे आहे. यासाठी योगगुरू बाबा रामदेव यांनी काही पद्धती सांगितल्या आहेत ज्यामुळे किडनी स्वच्छ आणि निरोगी राहते. (फोटो सौजन्य – iStock/Instagram)
खूप पाणी प्यावे
पाणी पिणे आहे आवश्यक
किडनीचे आरोग्य राखण्यासाठी पाणी आवश्यक आहे. पुरेसे पाणी प्यायल्याने किडनी विषारी पदार्थ फिल्टर करते आणि शरीर हायड्रेट ठेवते. पुरेसे पाणी प्यायल्याने किडनी स्टोन होण्याचा धोका कमी होतो. हे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते, जे किडनीच्या कार्यासाठी आवश्यक आहे.
हेदेखील वाचा – किडनी फेल होण्याची राहणार नाही भिती, 5 पदार्थांचा करा आहारात समावेश
वजन करा कमी
वजन कमी केल्याने होईल किडनीतून व्यवस्थित फिल्टर
वजन नियंत्रित करून किंवा कमी करून किडनीचे कार्य सुधारले जाऊ शकते. यामुळे हृदय निरोगी राहण्यासही मदत होते. वजन कमी केल्याने किडनीची चरबी कमी होते, ज्यामुळे किडनी अधिक चांगले कार्य करू शकते. वजन वाढल्याने अनेक त्रासांना सामोरे जावे लागते, ज्यामध्ये किडनीलाही त्रास होऊ शकतो.
धुम्रपान करू नये
धुम्रपान करणे टाळावे
धुम्रपान केल्याने किडनीचे अनेक प्रकारे गंभीर नुकसान होऊ शकते. यामुळे काही किडनी कर्करोग होण्याचा धोका वाढू शकतो. तुमचे हृदय आणि रक्तवाहिन्यांना नुकसान पोहचू शकते, ज्यामुळे किडनीतील रक्त प्रवाह बिघडू शकतो आणि कालांतराने किडनी खराब होऊ शकते. त्यामुळे धुम्रपान करणे टाळावे.
हेदेखील वाचा – किडनी स्टोनपासून ते लोहाच्या कमतरतेपर्यंत, जास्त दुधाच्या चहामुळे 5 मोठे नुकसान
नियमित व्यायाम करा
व्यायाम करण्याची आहे गरज
व्यायाम केवळ तुमच्या आरोग्यासाठीच चांगला नाही तर तुमच्या किडनीच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. नियमित व्यायामामुळे तुमची किडनी निरोगी राहते आणि मूत्रपिंडाच्या अनेक आजारांचा धोका कमी होतो. यासाठी तुम्ही चालणे, धावणे, पोहणे, सायकलिंग, वेटलिफ्टिंग, योगा, पायलेट्स आणि स्ट्रेचिंग करू शकता.
रामदेव बाबांनी शेअर केले उपाय