कवुनी तांदळाचा फायदे
आहारात भात अवश्य खावा. हे कार्बोहायड्रेट्सचा एक चांगला स्रोत आहे आणि पोटासाठी आवश्यक फायबर, एमिनो ॲसिड, व्हिटॅमिन बी 6, लोह, नियासिन, फोलेट प्रदान करते. हा ऊर्जेचा खूप चांगला स्त्रोत आहे आणि सहज पचतो. बहुतेक लोक बासमतीला सर्वोत्तम तांदूळ मानतात. पण काळा कवुनी तांदूळ हा अँटिऑक्सिडंट्सच्या दृष्टीने सर्वात शक्तिशाली आहे जो अनेक धोकादायक आजारांपासून संरक्षण करतो. सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी ते खाण्याची पद्धत आणि वेळ सांगितली आहे.
काळा कवुनी भात ओळखायला अगदी सोपा आहे. काळा-वायलेट रंग त्याबद्दल सहज सांगतो. याचा उगम भारत आणि चीनमध्ये झाल्याचे मानले जाते. या भाताचे अधिक फायदे सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी सांगितले आहे (फोटो सौजन्य – iStock/Instagram)
सद्गुरू म्हणतात ‘जादुई तांदूळ’
सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी काळ्या कवुनी तांदळाला ‘काळी जादू’ म्हटलं आहे, याचे कारण म्हणजे हा तांदूळ चमत्कारासारखा आहे. काळा कवुनी तांदूळ हा अनेक पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहे. ज्यामध्ये प्रथिने, फायबर आणि लोह प्रमुख असतात आणि जे शरीराला अधिक पोषक तत्व मिळवून देतात असं त्याचं म्हणणं आहे. आपल्या इन्स्टाग्राममध्ये शेअर केलेल्या व्हिडिओत त्यांनी याबाबत सांगितले आहे.
जेवणासाठी उत्तम तांदूळ
सद्गुरुच्या मते, काही अभ्यासात असे दिसून आले आहे की त्यात 23 प्रकारचे अँटिऑक्सिडंट्स आहेत आणि हे इतर कोणत्याही तांदळापेक्षा जास्त आहे. याचा अर्थ अँटिऑक्सिडंट्सच्या बाबतीत हा जगातील सर्वोत्तम तांदूळ आहे. हा गुण हृदयरोगांपासून संरक्षण करतो. यामुळे हा ब्लॅक कवुनी तांदूळ अधिक महत्त्वाचा आहे.
सर्वात बेस्ट तांदूळ कोणते? Sadhguru Jaggi Vasudev ने दिले उत्तर, रोखू शकता कॅन्सर
कॅन्सरपासून बचाव
अँथोसायनिन रंगद्रव्यामुळे या तांदळाचा रंग काळा-व्हायोलेट आहे. शरीरावर उत्कृष्ट अँटीइन्फ्लेमेटरी आणि अँटीकॅन्सर प्रभाव आहे. सद्गुरुच्या मते, दररोज याचे सेवन करणे स्तनाच्या कर्करोगाचा प्रसार कमी करण्यासाठी फायदेशीर असल्याचे दिसून आले आहे. त्यानी याबाबात अधिक माहिती आपल्या व्हिडिओमध्ये नमूद केली आहे.
कसे खावे कवुनी तांदूळ
कवुनी तांदळाची खिचडी किंवा दलिया बनवून खाणे अधिक फायदेशीर असल्याचे सद्गुरूंनी सांगितले. नाश्त्यात ते खाणे हा एक उत्तम पर्याय आहे. अशा प्रकारे तुम्हाला त्याचे फायदे मिळू शकतात. कवुनी तांदूळ हे ब्लॅक असून त्याचा आपल्या आहारात समावेश करणं आरोग्याच्या दृष्टीने चांगले ठरू शकते असेही सांगण्यात आले आहे.
जेवल्यानंतर पाणी पिणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या सद्गुरू आणि डॉक्टरांचा सल्ला
सर्वात चांगला तांदूळ कोणता?