२००३: शांघाय ट्रान्सरॅपिड या प्रवासी रेल्वेने ५०१ किमीतास या वेगाने जाण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला.
२०००: १२ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
१९९८: परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना व्हिसाशिवाय मायदेशी येण्याची सुविधा देणारी पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजीन (PIO) ओळखपत्र योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी जाहीर केले.
१९९७: १९९३ च्या जागतिक व्यापार केंद्रावर बॉम्बफेक करणारे रमोजी युसेफ दोषी ठरले.
१९९०: टिम बर्नर्स-ली यांनी वर्ल्ड वाइड वेबसाठी औपचारिक प्रस्ताव प्रकाशित केला.
१९५६: मोरोक्को, सुदान आणि ट्युनिशियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९४५: पुण्यात महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू व सरदार वल्लभभाई पटेल यांची राजकीय परिस्थितीवर साडेदहा तास चर्चा झाली.
१९३०: पहिल्या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.
१९२७: सोविएत कम्युनिस्ट पक्षातुन लिऑन ट्रॉटस्कीची हकालपट्टी करण्यात आल्यामुळे जोसेफ स्टॅलिनच्या हातात सर्व सत्ता गेली.
१९१८: ऑस्ट्रिया प्रजासत्ताक बनले.
१९०५: नॉर्वेच्या जनतेने सार्वमतात प्रजासत्ताक होण्याऐवजी राजसत्ताच कायम ठेवण्याचा कौल दिला.
१२ नोव्हेंबर जन्म
१९६३: ऑस्टॅथिओस पॅथ्रोस – भारतीय सिरियाक ऑर्थोडॉक्स प्रीलेट
१९६१: नादिया कोमानेसी – रोमानियन जिम्नॅस्ट, ओलम्पिक जिम्नॅस्टिक मध्ये पहिल्यांदा १० पैकी १० गुण मिळवणाऱ्या पहिल्या व्यक्ती
१९४०: अमजद खान – हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले खलनायक
१९०४: एस. एम. जोशी – समाजवादी, कामगार नेते आणि पत्रकार
१९०४: श्रीधर महादेव जोशी – संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू
१८९६: डॉ. सलिम अली – बर्डमॅन ऑफ इंडिया – पद्म भूषण
१८८९: डेव्हिट वॅलेस – रीडर डायजेस्टचे सह्संथापक
१८८०: सेनापती बापट – सशस्त्र क्रांतिकारक, तत्वचिंतक
१८६६: सन यट-सेन – चीन प्रजासत्ताकचे पहिले अध्यक्ष
१८१७: बहाउल्ला – बहाई पंथाचे संस्थापक
१६०६: जीन मॅन्स – फ्रेंच नर्स, कॅनडा मधील पहिले सामान्य रुग्णालयाच्या संस्थपिका
१२ नोव्हेंबर निधन
२०२०: असिफ बसरा – भारतीय चित्रपट अभिनेते
२०१४: रवी चोप्रा – भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते
२००७: के. सी. इब्राहिम – भारतीय क्रिकेटपटू
२००५: प्रा. मधु दंडवते – माजी केंद्रीय मंत्री समाजवादी नेते
१९९७: विनायक भट्ट घैसास गुरुजी – वेदाध्ययन आणि त्याचा प्रसार यासाठी संपूर्ण आयुष्य वाहिलेले आचारनिष्ठ घनपाठी वेदाचार्य
१९६५: ताहेर सैफुद्दीन – भारतीय धर्मगुरू
१९५९: बाळूकाका कानिटकर – अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक
१९५९: केशवराव मारुतराव जेधे – स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते
१९४६: पं. मदन मोहन मालवीय – बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक
Web Title: Special day 12 november 2022 birthday of senapati bapat armed revolutionary philosopher nrrd