लग्न केल्याने वाढतंय पुरुषांचं आयुष्य (फोटो सौजन्य - iStock)
लग्नाबद्दल अनेक समजुती आहेत, ज्या धर्म, संस्कृती आणि स्थानानुसार बदलतात. परंतु जर आपण हिंदू धर्माबद्दल बोललो तर, महिला त्यांच्या पतींच्या दीर्घायुष्यासाठी अनेक उपवास आणि विधी पाळतात. याचा पतीच्या वयावर किती परिणाम होतो यावर भाष्य करणे कठीण आहे. परंतु हे सिद्ध झाले आहे की पुरुषांच्या आयुष्यात पत्नीच्या आगमनाने त्यांच्या जीवनाचा दर्जा वाढतो. आता हे वाचून नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटलं असणार. पण आता एका अभ्यासातून असे सिद्ध झाले आहे की, लग्न झाल्यानंतर पुरुषांचे आयुष्य वाढते.
नक्की काय आहे हे गौडबंगाल असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर आम्ही अगदी पुराव्यासह तुम्हाला या लेखातून तुम्हाला कोणत्या अभ्यासात हे सिद्ध झाले आहे हे सांगणार आहोत. वाचा सविस्तर (फोटो सौजन्य – iStock)
काय सांगतो दावा
अलिकडच्या एका अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की विवाहित पुरुष निरोगी राहण्याची आणि लग्न न करणाऱ्या किंवा जोडीदाराशिवाय राहणाऱ्या पुरुषांपेक्षा जास्त काळ जगण्याची शक्यता जास्त असते. या अभ्यासातून असेही दिसून येते की लग्नाचा पुरुष आणि महिलांच्या वयावर वेगळा परिणाम होतो. विवाहित पुरुषांचे आयुष्य हे अविवाहित पुरुषांपेक्षा हळूहळू वाढते, परंतु महिलांच्या बाबतीत परिस्थिती थोडी वेगळी आहे.
लग्न घरात या गोष्टी आणतात नकारात्मक ऊर्जा, वास्तू दोषांमुळे शुभ कार्यात येऊ लागतात अडथळे
महिला आणि पुरुषांवर लग्नाचा परिणाम
जे पुरुष आपल्या जोडीदारासोबत राहतात ते जास्त काळ जगतात. याउलट, विवाहित महिलांचा वृद्धत्वाचा अनुभव अविवाहित महिलांपेक्षा फारसा वेगळा नव्हता. अभ्यासानुसार, घटस्फोटित किंवा विधवा महिलांना अविवाहित महिलांपेक्षा वृद्धत्वाची प्रक्रिया अधिक कठीण असते. महिलादेखील लग्नानंतर अधिक आयुष्य जगू शकतात असेच या अभ्यासात सांगण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात ही परिस्थिती आहे की नाही याची प्रचिती व्यक्तिपरत्वे वेगळी असू शकते.
कसा करण्यात आला अभ्यास
हा अभ्यास कॅनडामधील वृद्धांवर आधारित होता, ज्यामध्ये ४५ ते ८५ वर्षे वयोगटातील लोकांच्या आरोग्याचा आणि जीवनशैलीचा २० वर्षे मागोवा घेण्यात आला. यामध्ये, विवाहित असण्याचा किंवा नसल्याचा त्यांच्या आरोग्यावर आणि वृद्धत्वावर काय परिणाम होतो हे समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या अभ्यासातून हे स्पष्ट होते की लग्नाचा जीवनावर होणारा परिणाम पुरुष आणि स्त्रियांसाठी वेगवेगळा असू शकतो. या अभ्यासातून असेही दिसून आले आहे की वय वाढत असताना, लग्नाचे महत्त्व केवळ शारीरिक आरोग्यावरच नाही तर मानसिक आणि भावनिक आरोग्यावरदेखील परिणाम करते.
तळहातावर अशी लग्न रेषा एकापेक्षा जास्त लग्नांचे संकेत देते, जाणून घ्या
टीप – ही माहिती केवळ अभ्यासाच्या आधारे देण्यात आली आहे. आम्ही या स्वरूपाचा कोणताही दावा करत नाही. अभ्यासाची लिंक या लेखात जोडण्यात आली आहे. त्यानुसार आपण ही माहिती वाचावी.






