कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काय खावे (फोटो सौजन्य - iStock)
कोलेस्ट्रॉल जास्त वाढल्यास हार्टसाठी धोकादायक असते आणि यामुळे आपला जीवही जाऊ शकतो. हे अनेकदा आपण अभ्यासात वाचले आहे. मात्र यासाठी तुम्ही घरगुती उपाय शोधत असाल तर आपल्या नियमित जेवणातील भेंडी भाजी ज्याला इंग्रजीत Okra म्हणतात त्याचा तुम्ही योग्य पद्धतीने वापर करून घेऊ शकता. तुम्हाला माहीत आहे का? भेंडी उकडून खाल्ल्यास कोलेस्ट्रॉल कमी करण्यास त्याची मदत होते.
वास्तविक भेंडी भाजीमध्ये असणाऱ्या सॉल्युबल फायबर आणि पोषक तत्वामुळे शरीरातील फॅट्सचे शोषण नियंत्रणात राहते आणि त्यामुळे घाणेरड्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होण्यास आणि हृदयाची स्थिती चांगली राहण्यास मदत मिळते. भेंडीचा आपण नियमित जेवणात कसा उपयोग करून घेऊ शकतो याची अधिक माहिती घेऊया. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने दिलेल्या अहवालानुसार याचा कसा उपयोग करून घ्यावा जाणून घ्या. (फोटो सौजन्य – iStock)
सॉल्युबल फायबरयुक्त भेंडी
भेंडी ठरते फायदेशीर
भेंडीमध्ये म्युसिलेज नावाचा एक बुळबुळीत पदार्थ असतो, जो एक प्रकारचे सॉल्युबल फायबर म्हणून ओळखला जातो. जेव्हा तुम्ही भेंडी उकडून खाता तेव्हा हे फायबर पोटात जाते आणि डायजेस्टिव्ह सिस्टिममध्ये कोलेस्ट्रॉल चांगले जखडून ठेवते आणि त्यानंतर शरीरातून वाईट कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यास मदत करते. यामुळे शरीरातील जमा झालेले बॅड कोलेस्ट्रॉल हळूहळू बाहेर पडते आणि याचा हृदयावर ताण येत नाही.
वितळू लागेल नसांमध्ये साचलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल, रोज सकाळी उठताच पाण्यात मिसळून प्या 3 मसाले
भेंडीमधील पोषक तत्व
उकडलेल्या भेंडीमध्ये व्हिटामिन सी, व्हिटामिन ए आणि फोलेटसारखे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे धमन्यांमधील जळजळ कमी करतात आणि हृदयरोगापासून संरक्षण करतात. याशिवाय, त्यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियमदेखील असते जे रक्तदाब नियंत्रित करते. जेव्हा हे सर्व गुणधर्म एकत्र केले जातात तेव्हा शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी स्थिर राहते.
उकडलेली भेंडी कशी खावी?
भेंडीचे सेवन कसे कराल
उकडलेले भेंडी सकाळी रिकाम्या पोटी खाऊ शकता. यासाठी ४-५ भेंडी धुवून त्यांचे लहान तुकडे करा आणि रात्रभर पाण्यात भिजवा. सकाळी ५-१० मिनिटे उकळवा आणि रिकाम्या पोटी ते सेवन करा. काही लोक उकडलेल्या भेंडीचे पाणीदेखील पितात, जे फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असते आणि यामुळे शरीरातील LDL कोलेस्ट्रॉल त्वरीत कमी होण्यास मदत मिळते.
लक्षात ठेवा
भेंडी खाताना काय लक्षात ठेवावे
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.