साहित्य कॉर्न बटाटा गाजर कोबी पनीर बटर मीठ काळी मिरे पूड ब्रेड क्रम्ब्स कृती कॉर्न उकडून मिक्सरमध्ये त्याची पेस्ट बनवावी. पॅनमध्ये बटर टाकून ही पेस्ट फ्राय करावी. यात गाजर खिसून व कोबी बारीक चिरून घालावी. नंतर यात मिठ व काळी मिरे पूड घाला. मग उकडलेले बटाटे मॅश करून पनीर खिसून टाकावे. हे सर्व एका बाऊलमध्ये घेऊन नीट मिक्स करावे. मग फ्रेश कोथिंबीर बारीक चिरून टाकावी आणि नीट मिक्स करावे. आता हे मिश्रण हातावर घेऊन त्याला फिंगर्स सारखा आकार द्या. नंतर एका प्लेटमध्ये ब्रेड क्रम्ब्स घेऊन फिंगर्स त्यात घोळून घ्यावे. मग गरम तेलात हलक्या आचेवर तळून घ्यावे. तुमचे कॉर्न व्हेजी फिंगर तयार. याला मेयोनीज किंवा टोमॅटो सॉस सोबत खावे.